Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवड हादरले : मणक्याचे ऑपरेशन झालेल्या महिलेचा डॉक्टराकडूनच विनयभंग!

पिंपरी-चिंचवड : वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील (Pimapari- Chinchwad) आकुर्डी (Akurdi) येथे उघडकीस आली आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका ३७ वर्षीय महिलेचा चक्क उपचार करणाऱ्या डॉक्टरानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपी डॉक्टराला बेड्या ठोकल्या आहेत.



नेमकी घटना काय ?


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पाठीच्या मणक्याच्या उपचारासाठी ८ जून रोजी आकुर्डीतील 'चेतना रुग्णालयात' दाखल झाली होती. ११ जून रोजी महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. महिला रुग्णालयातच उपचार घेत असताना १४ जून रोजी पहाटेच्या सुमारास डॉ. धैर्यशील शेटके याने महिलेच्या वार्डमध्ये प्रवेश केला. यावेळी पीडित महिला आपल्या पतीसोबत होती.


उपचाराच्या बहाण्याने जवळ आलेल्या डॉक्टरने महिलेसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केला. महिलेचा आवाज ऐकून तिथे उपस्थित असलेल्या पतीला धक्काच बसला. त्यानंतर महिलेच्या पतीने तात्काळ या प्रकाराची माहिती निगडी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी तात्काळ रुग्णालय गाठले आणि पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी डॉ. धैर्यशील शेटके याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.



समाजात संताप


'डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप मानले जाते', असे म्हटले जाते. मात्र, अशाच एका 'देवरूपी' डॉक्टराकडून रुग्णाचे शोषण झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. रुग्णालयासारख्या सुरक्षित ठिकाणी आणि स्वतःच्या पतीसमोरच असा प्रकार घडल्याने रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी