Devendra Fadnavis : पाऊस २३ जूननंतरच, पाणी जपून वापरा!

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या पाणीटंचाईचे पडसाद मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ २५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. उपलब्ध पाणीसाठ्याचे संकट लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाणी अत्यंत जपून वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, हवामान अंदाजानुसार येत्या २३ जूननंतर राज्यात मान्सून पूर्ववत सक्रिय होईल, अशी शक्यता बैठकीत वर्तवण्यात आली.



मंगळवारी मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा विभागातर्फे राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याबाबतचे सविस्तर सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्यात आले. या अहवालातील आकडेवारी अत्यंत चिंताजनक असून, पुढील अडीच महिने पाण्याचा काटेकोर वापर करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.


जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, राज्यातील एकूण ३ हजार २८ लहान-मोठ्या धरणांमध्ये सध्या अवघा १ हजार ४४२.३४ टीएमसी म्हणजेच फक्त २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये ३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा ६ टक्क्यांनी घटला आहे. जिल्हानिहाय आणि विभागनिहाय आकडेवारीचा विचार केला असता, पुणे विभागातील परिस्थिती सर्वाधिक गंभीर असल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या ७२४ धरणांमध्ये सध्या ५३८.६४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून हे प्रमाण गेल्या वर्षीच्या २८ टक्क्यांच्या तुलनेत कमालीचे घटले आहे.




३१ ऑगस्टपर्यंत काटेकोर नियोजनाचे आदेश


- २३ जूननंतर जरी मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज असला, तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने आधीच सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. धरणांमधील उपलब्ध पाणी पिण्यासाठी प्राधान्याने राखून ठेवले जावे आणि ३१ ऑगस्टपर्यंत पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरला जावा, अशा सूचना मंत्रिमंडळ बैठकीत सूत्रांनी दिल्या आहेत.
- पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीने पावले उचलत सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
- त्यानुसार, धरणांमधून किंवा मुख्य जलवाहिन्यांतून होणारा पाण्याचा अवैध उपसा रोखण्यात यावा आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सध्याच्या राज्य सरकारच्या धोरणानुसार, टंचाईच्या काळात जर संबंधित धरणात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध असेल, तरच खरिपाच्या पिकांसाठी सिंचनाचे पाणी सोडण्याबाबत नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी