Ravichandra Ashwin : आर. आश्विन या पाकिस्तान खेळाडूसोबत एकत्र खेळणार ! दोघ एकाच संघात

मुंबई : भारताचा माजी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आता अमेरिकेच्या टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने आगामी मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) हंगामासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत करार केला असून, या स्पर्धेत खेळणारा तो पहिला माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.विशेष म्हणजे या संघात एका पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाचाही समावेश करण्यात आला आहे.


मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) हंगामासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाने २०२६ च्या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफलाही संघात समाविष्ट केले आहे.अश्विनही आता या संघाकडून खेळणार आहेच. हॅरिस रौफ सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत पहिल्या हंगामापासून म्हणजेच २०२३ पासून खेळत आहे.अश्विनही आता या संघाकडून खेळणार आहेच.हॅरिस रौफ सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत पहिल्या हंगामापासून म्हणजेच २०२३ पासून खेळत आहे.यामुळे सोशल मिडिया वर चर्चांना उधाण आले आहे.(Vaibhav Sooryvanshi)


भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रिकेट मालिका बऱ्याच वर्षांपासून बंद आहे. अशा परिस्थितीत, भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट (MLC) मध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाकडून एकत्र खेळणार आहेत. अश्विन हा या अमेरिकन लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे. या निमित्ताने, इतिहासामध्ये जेव्हा-जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघाकडून (Locker Room) मैदानात उतरले आहेत, अशा काही प्रसंगांकडे आपण पाहूया.




  1. मेजर लीग क्रिकेट (अमेरिका - २०२६): रविचंद्रन अश्विन आणि हॅरिस रौफ हे अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघातून एकत्र खेळत असून हा सध्या क्रीडा जगतात चर्चेचा विषय ठरला आहे.

  2. आफ्रो-आशिया कप (२००५-२००७): आशियाई एकादश (Asia XI) संघाकडून खेळताना भारताचे सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि इरफान पठाण हे पाकिस्तानच्या शोएब अख्तर, इंझमाम-उल-हक आणि शाहिद आफ्रिदी यांच्यासोबत एकाच संघात खेळले होते.

  3. विल्स इंडिया आणि पाकिस्तान XI (श्रीलंका - १९९६): १९९६ च्या विश्वचषकापूर्वी श्रीलंकेला पाठिंबा देण्यासाठी कोलंबोमध्ये एक मैत्रीपूर्ण सामना झाला होता. यात सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझहरुद्दीन यांनी पाकिस्तानच्या वसीम अक्रम आणि वकार युनिस यांच्यासोबत मिळून 'भारत-पाकिस्तान संयुक्त इलेव्हन'चे प्रतिनिधित्व केले होते.

  4. विभाजनापूर्वीचा इतिहास: अब्दुल हफीझ कारदार, आमीर इलाही आणि गुल मोहम्मद या तीन क्रिकेटपटूंनी फाळणीपूर्वी अखंड भारताकडून आणि नंतर १९५० च्या दशकात पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते.

Comments
Add Comment

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या

IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या