Vaibhav Sooryvanshi : आयपीएलमध्ये षटकारांचा वर्षाव, पण वनडेत संघर्ष! नेमकं वैभवसमोर आव्हान काय ?

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये बेबी बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारत अ संघात संधी देण्यात आली होती. मात्र या संधीचे सोने करण्यात वैभव अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत वैभव अपेक्षाप्रमाणे कामगिरी करू शकला नाही आणि मागील सामन्यात आउट झाल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत त्याचा वादही झाला.यामुळे सोशल मीडियावर वैभवच्या बाबतीत चर्चा सुरू झाल्या आहेत.



तिरंगी मालिकेत वैभवची कामगिरी


आयपीएलमधील अविस्मरणीय कामगिरीमुळे बीसीसीआयने वैभवला १५ व्या वर्षीच भारत अ संघात संधी दिली. तिरंगा मालिकेत भारत अ संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यांत वैभवला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलेले नाही. त्याच्या या खराब फॉर्मचे मुख्य कारण फॉरमॅट बदलणे असल्याचे सांगितले जात आहे. वैभव सूर्यवंशीने टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक आणि प्रभावी फलंदाजी केली आहे.मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची बॅट अपेक्षेप्रमाणे चाललेली नाही. विशेष म्हणजे, अंडर १९ स्तरावर या प्रकारात त्याने चांगली कामगिरी केली होती,परंतु वरिष्ठ स्तरावरील क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून त्याला सातत्य राखण्यात अपयश आले आहे.


पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध वैभव अवघ्या सहा धावांवर बाद झाला. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने थोडी फटकेबाजी केली,परंतु या सामन्यातही तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध २२ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात वैभवने संयमी सुरुवात केली. त्याने १२ चेंडूंमध्ये १४ धावा केल्या. (sports)



आयपीएलमध्ये वैभवची कामगिरी


वैभव सूर्यवंशीने गेल्या हंगामात १९ एप्रिल २०२५ ला लखनऊ विरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १७ सामने खेळले आहेत.आयपीएलच्या १७ सामन्यात त्याने ६५६ धावा केल्या आहेत यात २ शतकं आणि तीन अर्धशतकांचाही समावेश आहे.वैभवने आयपीएलच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार मारले आहेत. याआधी हा विक्रम मुरली विजयच्या नावावर होता. त्याने आयपीएलच्या अवघ्या १५ डावात ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. तो आयपीएल इतिहासात सर्वात जलद ५०० धावा करणारा फलंदाज आहे.आयपीएल इतिहासात सर्वात जलद शतक मारणाऱ्या खेळाडूंमध्ये वैभवचा समावेश आहे. त्याने आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. त्याच्या पुढे फक्त ख्रिस गेल आहे.आयपीएल २०२६ मध्ये वैभवने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १६ सामन्यात ७७६ धावा केल्या आणि या हंगामात सर्वाधिक षटकारही मारले आहेत.



वैभव का ठरतोय मागे ?


वैभवच्या खराब फॉर्मचे नेमके कारण फॉरमॅट बदलणे असे सांगितले जात आहे. याचे एक कारण फॉरमॅटबाबतचा गोंधळ असू शकते. टी-२० मध्ये तो ज्या नैसर्गिक शैलीत खेळतो, त्यापेक्षा वेगळा आणि अधिक सावध पवित्रा तो एकदिवसीय सामन्यांत घेताना दिसत आहे. अति-आत्मविश्वास हे देखील एक कारण असू शकते. श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ संघांच्या गोलंदाजांना कमी लेखण्याची चूक तो करत असल्याची चर्चा आहे. असे दिसते की, प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी त्याच्या खेळाचे व्हिडिओ अभ्यासले आहेत आणि त्याच्याविरुद्ध अधिक चांगल्या रणनीती आखल्या आहेत, ज्यामुळे त्यांना त्याच्या कमकुवत बाजूंचा यशस्वीपणे फायदा घेता येत आहे.

Comments
Add Comment

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव