Vaibhav Sooryvanshi : वैभव सूर्यवंशीचे करिअर संकटात ? भारतीय संघात पदार्पण करण्याआधीच बॅनची शक्यता

मुंबई : भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील तिरंगी मालिकेतील सामन्यानंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुपर ओव्हरमध्ये भारताच्या पराभवानंतर मैदानावर घडलेल्या एका घटनेमुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सामन्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूसोबत झालेल्या शाब्दिक वादानंतर वैभवने प्रतिस्पर्धी खेळाडूला धक्का दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चा होत आहे.(Vaibhav Sooryvanshi)



नेमकं काय घडलं?


सुपर ओव्हरमध्ये भारत अ संघाला विजयासाठी 17 धावांची गरज होती. मात्र वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे यांना केवळ 9 धावा करता आल्या आणि भारताला निसटता पराभव स्वीकारावा लागला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू मैदानाबाहेर जात असताना काही शब्दांची देवाणघेवाण झाली.यावेळी वैभव अचानक श्रीलंकेच्या गोलंदाजाच्या दिशेने धावत गेल्याचे दिसले. परिस्थिती शांत करण्यासाठी मध्ये पडलेल्या विशेन नावाच्या खेळाडूलाही त्याने धक्का दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अखेर वरिष्ठ खेळाडू निरोशन डिकवेलाला हस्तक्षेप करून वाद शांत करावा लागला.



ICC आचारसंहितेनुसार कारवाई होणार?


या प्रकरणावर अद्याप आयसीसीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी हा प्रकार ICC Code of Conduct च्या कलम 2.12 अंतर्गत येऊ शकतो. या नियमांनुसार एखाद्या खेळाडूने प्रतिस्पर्धी खेळाडू,पंच, सामना अधिकारी किंवा इतर कोणाशीही अयोग्य शारीरिक संपर्क साधल्यास त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते.



आंतरराष्ट्रीय पदार्पणावर परिणाम?


वैभव सूर्यवंशीला लवकरच भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या वादानंतर त्याच्यावर कोणती शिस्तभंगात्मक कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर गंभीर दोषी ठरला तर त्याच्या आगामी संधींवर परिणाम होऊ शकतो. सध्या मात्र अंतिम निर्णयाची प्रतीक्षा असून, क्रिकेट चाहत्यांसह भारतीय संघ व्यवस्थापनाची नजर मॅच रेफरींच्या अहवालावर खिळली आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून