Canada vs. Netherlands: २५ चेंडूंनंतर सामना रद्द, टोरोंटोच्या मैदानावर बंदी ? नेमकं कारण काय ?

कॅनडा : मंगळवार, १६ जून रोजी, कॅनडातील टोरोंटो स्टेडियमवर नेदरलँड्स आणि कॅनडा यांच्यात एकदिवसीय सामना खेळला गेला. नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, केवळ २५ चेंडूंनंतर सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द झाला तेव्हा, ४.१ षटकांत नेदरलँड्सच्या धावसंख्येवर १ गडी बाद १५ धावा झाल्या होत्या.नेदरलँड्सकडून मॅक्स ओ'डॉड डावाच्या दुसऱ्या षटकात एक धाव करून बाद झाला.


टोरोंटोच्या मैदानावर आयसीसीची बंदी ?


खेळपट्टीवर अतिरिक बाऊन्स असल्यामुळे नेदरलँड्स विरुद्ध कॅनडा सामना पंचांनी रद्द केला, पिचमधील असामन्या बाऊन्समुळे सामन्याच्या काही काळातच अनेक फलंदाज जखमी झाले. विशेष म्हणजे, याच खेळपट्टीवर यापूर्वी एक सामना खेळला गेला होता. कॅनडा-नेदरलँड्स सामन्याच्या चार दिवस आधी, १२ जून रोजी, आयसीसीने एक निवेदन जारी करून कळवले की, ८ जून रोजी अमेरिका विरुद्ध नेदरलँड्स एकदिवसीय सामन्यात वापरण्यात आलेली किंग सिटीची खेळपट्टी असमाधानकारक ठरवण्यात आली असून तिला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. अमेरिका आणि नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करणारे सामनाधिकारी फिल थॉम्पसन यांनी सांगितले की, खेळपट्टी सामन्याच्या दर्जापेक्षा निकृष्ट होती.





आयसीसीच्या खेळपट्टी नियमानुसार,असमाधानकारक दर्जा मिळालेल्या खेळपट्टीला एक डिमेरिट पॉइंट मिळतो. खराब दर्जाच्या खेळपट्टीला तीन डिमेरिट पॉइंट्स मिळतात. हे डिमेरिट पॉइंट्स पाच वर्षांसाठी सक्रिय राहतात. सहा डिमेरिट पॉइंट्स जमा झालेल्या खेळपट्टीवर १२ महिन्यांसाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास मनाई केली जाते.१२ डिमेरिट पॉइंट्स जमा झाल्यास २४ महिन्यांची बंदी येते. दरम्यान, टोरोंटोच्या खेळपट्टीवरही बंदीची कारवाई होत आहे. तिला ४ डिमेरिट पॉइंट्स मिळाले आहेत, जे कोणत्याही खेळपट्टीसाठी अत्यंत हानिकारक आहे. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास, या खेळपट्टीवर १२ महिन्यांसाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार नाहीत.
Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून