IND vs AFG 2nd ODI : शुभमन गिल-ईशान किशनची विक्रमी भागीदारी; भारताचा धावांचा डोंगर, अफगाणिस्तानसमोर 403 धावांचे आव्हान

लखनऊ : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. कर्णधार शुभमन गिलच्या ऐतिहासिक 154 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 49.5 षटकांत सर्वबाद 402 असा धावांचा विशाल डोंगर उभारला आहे.अफगाणिस्तानसमोर विजयासाठी आता 403 धावांचे लक्ष्य आहे.



शुभमन गिलची ऐतिहासिक खेळी


अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार शुभमन गिलने आक्रमक फलंदाजी करत 110 चेंडूत 154 धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 22 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.या खेळी दरम्यान गिलने मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. तो भारतासाठी सर्वात जलद 3000 वनडे धावा करणारा फलंदाज ठरला. गिलने हा टप्पा अवघ्या 62 डावांत पूर्ण करत शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांचा 72 डावांचा विक्रम मोडला.यशस्वी जयस्वाल (4) लवकर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डाव सावरला.






रोहितने 39 चेंडूत 48 धावांची आक्रमक खेळी केली, मात्र त्याचे अर्धशतक दोन धावांनी हुकले. रोहित बाद झाल्यानंतर ईशान किशनने गिलसोबत अफगाण गोलंदाजांची धुलाई केली.ईशानने अवघ्या 79 चेंडूत 125 धावांची स्फोटक खेळी करत शतक झळकावले. त्याच्या खेळीत 14 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.

224 धावांची विक्रमी भागीदारी


गिल आणि ईशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी केवळ 140 चेंडूत 224 धावांची भव्य भागीदारी रचली. या भागीदारीमुळे भारताने सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवले. श्रेयस अय्यरने 26 धावा केल्या, तर केएल राहुलला खातेही उघडता आले नाही. अखेरीस भारताचा डाव 402 धावांवर संपला.



अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी


अफगाणिस्तानकडून नांगेयालिया खरोटेने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, मात्र त्यासाठी त्याने 76 धावा दिल्या. रशीद खानने 3 बळी मिळवले, तर मोहम्मद सलीम सफी आणि एएम गझनफर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. 402 धावांची प्रचंड धावसंख्या उभारल्यानंतर भारतीय गोलंदाजांसमोर आता अफगाणिस्तानला रोखण्याचे आव्हान आहे. भारत मालिकेत आधीच 1-0 असा आघाडीवर आहे. हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची भारताकडे सुवर्णसंधी आहे.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात