Navnath Ban : ऑपरेशन टायगरमागे भाजपा, शिवसेना नव्हे तर उबाठातील अंतर्गत राजकारणच

भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काढली संजय राऊत यांची खरडपट्टी


Mumbai : 'ऑपरेशन टायगर'शी भाजपा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही तर 'ऑपरेशन टायगर' उबाठातील अंतर्गत शीतयुद्ध आणि वादामुळे होत आहे. संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा वापरतात, त्यामुळेच हे घडत आहे. संजय राऊत, तुम्हाला तुमचे खासदार तुमच्यासोबत ठेवता येत नाहीत, तुम्हाला तुमचे विचार तुमच्यासोबत ठेवता येत नसल्याने उबाठा गटाची ही अवस्था झाली आहे. हा काही बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही. तुमची दादागिरी इथे सहन केली जाणार नाही. तुम्ही कोणाला धमकावत असाल तर जशास तसे उत्तरही दिले जाईल, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



संजय राऊत यांना अश्लील शब्द वापरण्याची सवय आहे. कमरेखालचे शब्द वापरायचे, लोकांना शिव्या द्यायच्या. त्यांच्या याच भाषेवर महाराष्ट्रातील जनता रोज थुंकते आणि त्यांची रोज इज्जत काढते. परंतु ज्यांची इज्जत संपलेली असते त्यांना त्याचे काहीही पडलेले नसते. त्यांनी रोज असे शब्द वापरणे, अजून काही म्हणणे, यात काही नवीन नाही, अशा शब्दात श्री. बन यांनी फटकारले. बन पुढे म्हणाले, आई-बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन माणसे टिकवता येत नाहीत, पक्ष वाढवता येत नाही. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवली असती तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसती. लोक का सोडून जात आहेत? कारण तुम्ही आपल्या वडिलांचे विचार सोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसलात. येत्या काळात उबाठा गटाची आणि संजय राऊत यांची यापेक्षाही वाईट अवस्था होणार आहे. मुळात टायगर कोण आहे आणि शेळी कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे. संजय राऊत, आता गाढव नाक्यावर गाढवपणा करणे एवढेच तुमच्याकडे शिल्लक आहे.(PM Modi - PM Meloni)



संजय राऊत कोणाच्या जोरावर निवडून आले? एकनाथजी शिंदे यांच्या मतांवर ते राज्यसभेवर निवडून आले. एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान केले नसते तर ते राज्यसभेचे खासदार झाले नसते. हिंमत असेल तर त्यांनी सांगावे, ‘मी एकनाथजी शिंदे यांची मते नाकारतो. त्यांच्या मतांवर मला खासदार राहायचे नाही. माझी दोन वर्षांची खासदारकी शिल्लक आहे. मी तोंडावर राजीनामा फेकतो.’ आपल्या बुडाखाली किती अंधार आहे तो पहा. तुम्ही शिवसेनेच्या मूळ खासदारांच्या, मूळ आमदारांच्या जीवावर खासदार झालात. तेही अर्ध्या मताने निवडून आलात. त्यामुळे एकनाथजी शिंदे यांच्या मतांवर खासदार झाले त्यांनी आधी आपला राजीनामा दिला पाहिजे. राज्यसभेचे सदस्यत्व नाकारले पाहिजे आणि मग वर तोंड करून इतरांचे राजीनामे मागितले पाहिजेत. तोपर्यंत राऊत यांना इतरांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असेही श्री. बन यांनी सुनावले.


Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर