Nashik : एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाची शक्यता , शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध शेती करावी : रविंद्र माने

नाशिक : भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनो परिस्थिती सक्रिय राहण्याची शक्यता व्यक्त केली असून पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन, जलसंधारण आणि हवामानाधारित शेती व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.



नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ४० हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली जाते. यात मका, बाजरी, भात, सोयाबीन, मूग, भुईमूग, तूर यासह फळबागांचा समावेश आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीच्या ९० टक्के (±५ %) पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त केला असल्याने शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याची गरज कृषी विभागाने व्यक्त केली आहे.


फलोत्पादनासाठी द्राक्ष, डाळिंब व आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापन, मल्चिंग, बाष्परोधक फवारणी, ठिबक सिंचन आणि उन्हापासून संरक्षणाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.“एकच पीक, एकच पेरणी आणि पावसावर पूर्ण अवलंबित्व” ही पद्धत टाळून मिश्र पीक पद्धती, कमी कालावधीचे वाण, पाणी साठवण आणि हवामानानुसार निर्णय हे सूत्र शेतकऱ्यांनी स्वीकारावे, असे आवाहन नाशिक जिल्हा कृषी विभागाने केले आहे.



कृषी विभागाच्या प्रमुख सूचना :


अपुरा पाऊस असताना घाईघाईने पेरणी करू नये. किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.


संपूर्ण क्षेत्राची एकाच वेळी पेरणी न करता टप्प्याटप्प्याने पेरणी करावी.


दुबार पेरणीची गरज भासू नये यासाठी प्रमाणित बियाण्यांचा राखीव साठा ठेवावा.


कमी कालावधीच्या व दुष्काळसहिष्णू वाणांना प्राधान्य द्यावे.


ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, तीळ यांसारख्या कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड करावी.


तूर + सोयाबीन, बाजरी + तूर यांसारख्या मिश्र व आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.


बीबीएफ पद्धती, कंटूर बंडिंग, कंपार्टमेंट बंडिंग यांसारख्या जलसंधारण उपायांचा वापर करावा.


पीक अवशेष, पेंढा, पालापाचोळ्याचा वापर करून मल्चिंग करावे.


शेततळे, जलसाठे आणि सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर वाढवावा.


महाअॅग्री एआय व हवामान सेवांचा वापर करून हवामानानुसार शेती नियोजन करावे.


पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन यांसारख्या पूरक व्यवसायांकडे वळावे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण