Sushma Andhare : ठाकरे गटाचा व्हीप अवैध

सुषमा अंधारेंकडून ठाकरेंच्या चुकीची कबुली; बंडखोर खासदारांचे पत्र आधीच पोहोचल्याने उबाठाची मोठी नाचक्की


मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यामुळे आधीच 'मातोश्री'वर मोठे संकट कोसळले असताना, पक्षात समन्वयाचा पुरता अभाव असल्याचे समोर आले आहे. बंडखोर खासदारांना रोखण्यासाठी उबाठा गटाने जारी केलेला 'व्हीप' (पक्षादेश) कायदेशीररीत्या अवैध आणि अयोग्य ठरला असून, उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीच जाहीरपणे या घोडचुकीची कबुली दिली आहे.


पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे यांनी उबाठा पक्षाची मोठी नाचक्की केली. बंडखोर खासदारांचे अधिकृत पत्र कालच (मंगळवारी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंत पोहोचले होते. तरीही उबाठा पक्षाने आज उशिरा व्हीप बजावला, त्यामुळे तांत्रिक आणि कायदेशीर पातळीवर आमचा हा व्हीप पूर्णपणे चुकीचा आणि निकालात निघणारा ठरला आहे, अशी उद्विग्न कबुली अंधारे यांनी दिली.दिल्लीत झालेल्या या बंडानंतर उबाठा गटाने गुरुवारी सकाळी ११ वाजता आपल्या संसदीय कार्यालयात सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व खासदारांनी उपस्थित राहावे, यासाठी उबाठा पक्षाने व्हीप जारी केला. मात्र, बंडखोरांनी कालच (मंगळवारी) स्वतंत्र गटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे या व्हीपला कायद्याच्या दृष्टीने कवडीचीही किंमत उरलेली नाही. पक्षनेते अजूनही कायदेशीर कारवाईच्या बाता मारत असताना, सुषमा अंधारे यांनी मात्र पक्षनेतृत्वाच्या संथ कारभाराचा फुगा जाहीरपणे फोडला आहे.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर