UBT faction : उबाठातून फुटलेल्या खासदार आष्टीकरांचा मुलगा विधानपरिषदेत महाविकास आघाडीचा उमेदवार

मतदानाच्या तोंडावर नांदेडमध्ये नवा ट्विस्ट; काँग्रेसच्या मतांच्या विभाजनामुळे भाजपचे पारडे जड


मुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात ऐन मतदानाच्या तोंडावर मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. उबाठा गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर 'ऑपरेशन टायगर'मध्ये सामील झाले. मात्र, काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भाजपच्या विरोधात आपल्या मुलाला रिंगणात उतरवून काँग्रेस व महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवला होता. मात्र, खा. आष्टीकर उबाठातून फुटून शिंदे गटाच्या गळाला लागल्यामुळे या निवडणुकीला 'नवा ट्विस्ट' मिळाला आहे. वडिलांच्या या बदललेल्या भूमिकेनंतर त्यांचे पुत्र कृष्णा पाटील यांनी घाईघाईने एक व्हिडीओ जारी केला. आपण अजूनही उबाठा गटात असल्याचा दावा त्यांनी यात केला आहे. मात्र, या अंतर्गत गोंधळामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठी विभागणी होणे आता अटळ मानले जात आहे.(Opration Tiger)



खा. आष्टीकर हे मंगळवारपर्यंत उबाठा पक्षात अत्यंत सक्रिय होते आणि त्यांनी तशी जाहीर भूमिकाही घेतली होती. मात्र, उबाठाच्या ६ खासदारांनी मिळून केलेल्या बंडात सहभागी होण्यासाठी आष्टीकर हे मंगळवारी रात्री हैदराबादमार्गे दिल्लीला रवाना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नांदेड आणि हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांचे पुत्र कृष्णा पाटील हे या निवडणुकीत अपक्ष रिंगणात असले, तरी त्यांना उबाठा आणि काँग्रेसने संयुक्त पाठिंबा दिला होता. आता वडिलांनीच उबाठा गटाला जय महाराष्ट्र केल्यामुळे महाविकास आघाडीत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.या राजकीय भूकंपामुळे निवडणुकीतील तिसरे उमेदवार म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. काँग्रेसचे अनेक स्थानिक नगरसेवक सुरुवातीपासूनच आष्टीकर कुटुंबीयांच्या उमेदवारीच्या विरोधात होते. आता खा. आष्टीकर फुटीर गटात गेल्यामुळे काँग्रेसच्या नाराज नगरसेवकांनी आष्टीकरांच्या पुत्राला मतदान न करता वंचितच्या प्रशांत इंगोले यांना मतदान करावे, अशी उघड मागणी स्थानिक पातळीवर जोर धरू लागली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी काहीही निर्णय घेतला, तरी येथील स्थानिक राजकीय परिस्थितीत काँग्रेसच्या मतांचे विभाजन रोखणे आता अशक्य असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.



निवडणुकीचे गणित बदलले


दुसरीकडे, महाविकास आघाडीतील या यादवीचा फायदा उठवण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपने या जागेवर माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या यंत्रणेने पहिल्या काही दिवसांतच रणनीती आखत बहुसंख्य मतदारांना अज्ञात स्थळी सहलीवर पाठवले होते. सहलीवर गेलेले हे सर्व नगरसेवक बुधवारी लातूर येथे एकत्र जमले असून, भाजपचे ज्येष्ठ नेते खा. अशोक चव्हाण स्वतः बुधवारी सकाळीच लातूरला पोहोचून या गणितावर लक्ष ठेवून आहेत. मतदारसंघातील एकूण ४५२ मतदारांपैकी ३०० हून अधिक मतदारांची जुळवाजुळव भाजपने आधीच केली आहे. यात भाजपसह मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या महायुतीच्या सर्व नगरसेवकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने तर आपल्या सर्व नगरसेवकांवर 'व्हीप' (पक्षादेश) बजावून राजूरकर यांच्या बाजूने मतदान करण्याची सूचना केली आहे.
Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण