Monsoon Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; कोकणात पावसाचा जोर वाढणार

मुंबई : देशभरात आणि महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाल्यानंतर अचानक थबकलेल्या मान्सूनच्या प्रगतीसाठी आता पुन्हा एकदा अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या तीन दिवसांत मान्सून वाऱ्यांचा वेग वाढणार असून, २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढेल, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. या बदलामुळे गेले काही दिवस उन्हाचा आणि उकाड्याचा तडाखा सहन करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने ६ जून रोजी तळकोकणात धडक दिली होती. त्यानंतर ८ जूनपर्यंत त्याने हर्णे आणि सोलापूरपर्यंत मजल मारली. मात्र, पुढील वाटचालीस पोषक वातावरण नसल्यामुळे मान्सूनची उत्तर सीमा गेल्या अनेक दिवसांपासून एकाच जागेवर स्थिर आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने मोठी ओढ दिली असून, कोकण आणि गोव्यात १ ते १७ जून दरम्यान सरासरीच्या तुलनेत तब्बल ८१ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पुढील काही दिवस या भागात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता असून, २४ जूननंतरच पावसाचा जोर वाढेल. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये २१ जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. मात्र, सिंधुदुर्ग वगळता इतर भागात १९ जूनपर्यंत उष्ण आणि दमट वातावरण कायम राहील. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांत पुढील चार ते पाच दिवसांत हलक्या पावसाची शक्यता आहे.


वादळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत मान्सून वारे आता वेग घेत आहेत. १८ जूनपासून उत्तर-पश्चिम भारताच्या दिशेने वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


या राज्यांना मिळणार दिलासा

पुढील ४ ते ५ दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांत नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. तसेच उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्येही ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, ज्यामुळे तेथील तापमानात घट होऊन तीव्र उष्णतेपासून नागरिकांची सुटका होईल. देशभरात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकरी चिंतेत होते; मात्र आता हवामान प्रणाली पुन्हा सक्रिय झाल्याने पेरण्यांच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा