Nashik Crime : पतीच्या 'त्या' गोष्टीला कंटाळली अन शेवटी २२ वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केली

Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं सर्वानाच हादरा बसला आहे. नव्या संसाराची स्वप्ने डोळ्यांत साठवून सासरी गेलेल्या २२ वर्षीय विवाहितेने अखेर जीवनालाच पूर्णविराम दिला आहे. याचं कारणही तितकंच धक्कादायक आहे. शहरातील ध्रुवनगर परिसरातील जिजामाता कॉलनी (शिवाजीनगर) येथे घडली आहे. पतीच्या अनैतिक संबंधांमुळे सतत मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.



नेमकं प्रकरण काय ?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी वैभव गोरे (वय २२) असे मृत विवाहितेचे नाव असून वैभव रावसाहेब गोरे (वय २३) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी ही निफाड (Niphad) तालुक्यातील रामनाथ दत्तू पगार यांची एकुलती एक मुलगी. एप्रिल २०२४ मध्ये मोठ्या कुटुंबाने मोठ्या आनंदात तिचा विवाह वैभव गोरे या तरुणासोबत लाऊन दिला होता. संसाराच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवताना तिनेही इतर मुलींप्रमाणे सुखी आयुष्याची स्वप्ने पाहिली. मात्र, पदरी निराशा पडली. लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या आयुष्यात निराशेचे ढग दाटू लागले.


फिर्यादीनुसार, वैभव गोरे याचे ध्रुवनगर (Dhruvanagar) परिसरातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे साक्षीला समजले. या प्रकारामुळे ती मानसिकदृष्ट्या खचून गेली होती. संसार टिकावा, नातेसंबंध सुधारावेत आणि पतीने आपले वर्तन बदलावे यासाठी साक्षीने अनेकदा प्रयत्न केले. तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनीही वैभवची वारंवार समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही असा आरोप करण्यात आला आहे.



'मला इथून घेऊन जा...'


मंगळवारी (१६ जून) दुपारी साक्षीने तिच्या मामाला फोन करून मनातील वेदना व्यक्त केल्या होत्या. पती पुन्हा संबंधित महिलेच्या घरी गेल्याचे आपण स्वतः पाहिल्याचे तिने सांगितले. यानंतर तिचा आणि त्या महिलेचा वादही झाला होता. मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेल्या साक्षीने मामाला, "तुम्ही काहीही करा, पण मला इथून तातडीने घेऊन जा," अशी विनंती केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फोनद्वारे केलेला हा तिच्या आयुष्यातील शेवटचा संवाद ठरला. काही वेळानंतर दुपारी दोनच्या सुमारास साक्षीने राहत्या घरात गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.



एकुलत्या एका मुलीच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा


साक्षी ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुलीचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आई-वडिलांनी केलेली स्वप्ने एका क्षणात भंगली. या घटनेने परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी (Gangapur Police) फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला