Prasad Savkar Passes Away : रंगभूमी पोरकी! काळाच्या पडद्याआड गेले दिग्गज कलाकार प्रसाद सावकार...

गोव्याचे ज्येष्ठ नाट्यकर्मी, गायक आणि अभिनेते प्रसाद सावकार (Prasad Savkar ) यांचे बुधवारी निधन (Death) झाले. निधनावेळी त्यांचे वय ९८ वर्षे होते. पणजी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रसाद सावकार हे मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक मान्यवर नाव होते. त्यांनी अनेक गाजलेल्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख भूमिका साकारत आपल्या अभिनय आणि गायनाने रसिकांची मने जिंकली. शास्त्रीय संगीताची भक्कम पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्यपूर्ण गायनशैली यामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली होती.

महाराष्ट्र ((Maharashtra)) आणि गोव्यातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफिली आणि नाट्यप्रयोगांमधून त्यांनी दीर्घकाळ कलाक्षेत्राची सेवा केली. अनेक युवा कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन केले तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही काम पाहिले.

कला आणि संस्कृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनामुळे मराठी संगीत रंगभूमीतील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मराठी संगीत नाटकांच्या जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना श्रद्धांजली संदेशांमधून व्यक्त करण्यात येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पोस्ट शेअर करत त्यांना श्रध्दांजली वाहली. पोस्टमध्ये त्यांनी लिहले आहे की, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गायक, अभिनेते आणि मराठी संगीत रंगभूमीचे दिग्गज व्यक्तिमत्त्व प्रसाद सावकार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने मराठी संगीत नाट्यक्षेत्रातील एक तेजस्वी पर्व संपुष्टात आले आहे.



त्यांच्या जाण्याने मराठी नाट्य आणि संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली असून, कला विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कार्याचा वारसा आणि सांस्कृतिक योगदान कायम स्मरणात राहील.
Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी