Rohini Paradhye Case : रील स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात एक वेगळे वळण ;पतीवर मोठा आरोप

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण तथा रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिने आपल्याच हॉटेल मध्ये गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. वयाच्या अवघ्या २५ वर्षी तिने हे टोकाचं पाऊल उचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.



नक्की प्रकरण काय ?
रोहीनेनी ५ वर्षेपूर्वी नवरा निलेश विलास पाराध्ये याच्याशी प्रेमविवाह केला. रोहिणी हि  रील स्टार(reel star) होती तर तिचा नवरा हा हॉटेल ग्रामपंचायतचा मालक होता. मात्र लग्नाच्या पाच वर्षा नंतर रोहिणीने आपल्याच्या हॉटेलच्या स्वयंपाकगृहात टोकाचं पाऊल उचलून गळफास घेत आपलं जीवन संपवलं. तिने मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचललं असं तिच्या वडिलांनी सांगितलं.



वडिलांनी सांगितलं...
रोहिणीच्या नवरा म्हणजेच निलेश हा तिला घरगुती कारणावरून तसेच तिची इच्छा नसताना तिला हॉटेलमध्ये काम करण्यास लावून तिच्याशी वारंवार वाद घालून भांडण करायचा. हाताने मारहाण व शिवीगाळ, दमदाटी करून शारिरीक व मानसिक त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली असा आरोप रोहिणीच्या वडिलांनी केला. तक्रार करतात पोलिसांनी नवरा निलेश विलास पाराध्ये याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. आता पुढील तपास चालू आहे. रोहिणीच्या या निर्णयाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने