‘Deool Band 2’ : ‘देऊळ बंद 2' सुसाट; ‘दृश्यम 3’ ‘आणि 'राजा शिवाजी’ चित्रपटालाही टाकलं मागे; नफा किती ?

Deool Band 2 : 'देऊळ बंद 2' या मराठी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा पहायला मिळत आहे. मे महिन्यात बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये ‘राजा शिवाजी’, ‘दृश्यम 3’, ‘करुप्पू’ या चित्रपटांचा समावेश होता. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. मात्र मे महिन्यातील टॉप 5 चित्रपटांमध्ये नफ्याच्या टक्केवारीच्या बाबतीत ‘देऊळ बंद 2’ ने सर्वांनाच मागे टाकले आहे.



ओरमॅक्स मीडियाने मे महिन्यातील टॉप 5 चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ‘करुप्पू’ 229 कोटी रुपयांच्या कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहे. मोहनलाल यांचा ‘दृश्यम 3’ 133 कोटी रुपयांच्या कमाईसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर तर ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने 113 कोटी रुपयांची कमाई करत तिसरं स्थान पटकावलं आहे. या यादीत एका हॉलिवूड हॉरर चित्रपटाचाही समावेश आहे. हा चित्रपट 102 कोटी रुपयांची कमाई करत चौथ्या स्थानावर आहे. तर ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट 90 कोटी रुपयांच्या कमाईसह पाचव्या स्थानी आहे.



मोठं मोठे गार केले गमंतमधी...


‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाची कमाई ही इतर चित्रपटांच्या तुलनेत सध्या कमी असली तरी बॉक्स ऑफिसवर नफा कमावण्याच्या बाबतीत ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट आघाडीवर आहे. 'देऊळ बंद 2’ हा अवघ्या 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला सिनेमा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 90 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर चित्रपट अजूनही थिएटरमध्ये हाऊसफुल ठरतोय. ‘देऊळ बंद 2’ने आतापर्यंत तब्बल 800% नफा कमावला आहे.



‘करुप्पू’ या दाक्षिणात्य चित्रपटाने 76.15 टक्के नफा आपल्या नावे केला आहे. 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 229 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा बजेट 75 कोटी रुपयांचा होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 113 कोटी रुपये कमावून 50.67% नफा मिळवला आहे. तर 100 कोटी रुपयांच्या बजेटमधील सस्पेन्स थ्रिलर ‘दृश्यम 3’ने 133 कोटी रुपये कमावून 33 टक्के नफा मिळवला आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’