Dhule : धुळे-सुरत महामार्गावर इंधन चोरीचा पर्दाफाश; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

धुळे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने धुळे-सुरत महामार्गावर सुरू असलेल्या गॅस आणि डिझेल चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पथकाने दोन दिवस गुप्त पाळत ठेवल्यानंतर ही कारवाई केली. पथकाने मारलेल्या या धाडीत सुमारे १ कोटी ५५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


ही कारवाई साक्री तालुक्यातील दहिवल गावाजवळ, सुरत-धुळे महामार्गावरील अन्नपूर्णा ढाब्याच्या मागील बाजूस आणि पार्श्वनाथ ढाब्यालगत करण्यात आली. राज्य दक्षता पथकाने अवैधरीत्या टँकरमधून गॅस व डिझेल काढून त्याचा साठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरावर नजर ठेवली होती. चोरी सुरू असतानाच पथकाने छापा टाकत संपूर्ण कारवाई यशस्वी केली.



कारवाईत गुजरातहून जळगावकडे जाणारा एलपीजी गॅस टँकर, त्यातील १७.४२ मेट्रिक टन गॅस, ३५ किलोलीटर डिझेलने भरलेला टँकर, बोलेरो पिकअप, छोटा ट्रक, १४० व्यावसायिक गॅस सिलिंडर, गॅस भरण्याची उपकरणे, वजनकाटे आणि डिझेल साठा जप्त करण्यात आला.


राज्य दक्षता पथकातील दीपेंद्र परुळेकर, अमोल बुरटे, पवन कुंबले, रवींद्र राठोड, राजेश सोरते, राहुल इंगळे, देवानंद इंगळे आणि राजीव भेले यांच्या पथकाने ही कारवाई केली. संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



महामार्गालगत सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे शासनाच्या महसुलाला फटका बसत होता. तसेच एलपीजी गॅसची बेकायदेशीर भराई केल्याने मोठा अपघात किंवा स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य दक्षता पथकाच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अशा अवैध व्यवसायांवर अधिक कठोर कारवाईची मागणीही जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.