PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच जमा

राज्यात २० जून हा दिवस ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे




प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) चा २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात २० जून हा दिवस 'पीएम किसान उत्सव दिवस' म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. (Dattatray Bharane)


कृषी विभागाच्या वतीने राज्यभर विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गावागावांत शेतकरी मेळावे, माहिती सत्रे आणि ऑनलाइन कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योजनेची माहिती दिली जाणार आहे. तसेच गावस्तरावर नियुक्त केलेले अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होऊन लाभार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. (Agriculture News)



पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) ही देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आधार लिंक, e-KYC आणि बँक खात्याशी संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.


राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी कृषी विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. अनेक शेतकऱ्यांना अद्याप काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता मिळालेला नसल्याने त्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



दरम्यान, शेतकरी 'Know Your Status' या सुविधेचा वापर करून आपल्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात. हप्ता कोणत्या खात्यात जमा झाला आहे याची माहितीही या माध्यमातून मिळू शकते.


केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जात असून 20 जून रोजी होणाऱ्या पीएम किसान उत्सव दिवस कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी