FIFA World Cup 2026 : चेक संघाचा विजय हुकला, दक्षिण आफ्रिकेने वाचवला सामना

अटलांटा : विश्वचषकातील गट ‘अ’ मधील महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि चेक रिपलिक (Czech Republic) यांच्यात १-१ अशी बरोबरी झाली. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात मिळालेल्या पेनल्टीवर तेबोहो मोकोएनाने गोल करत दक्षिण आफ्रिकेच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. FIFA World Cup 2026


सामन्याच्या सुरुवातीलाच चेक संघाने आक्रमक खेळ करत आघाडी घेतली. सहाव्या मिनिटाला मिखाल सादिलेक याने अचूक फिनिश करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चेक संघाने अनेक संधी निर्माण केल्या, मात्र आघाडी वाढवण्यात त्यांना यश आले नाही. (Atlanta)


दुसऱ्या हाफमध्ये दक्षिण आफ्रिकेने पुनरागमनाचा प्रयत्न सुरू ठेवला. सामन्याच्या ८३व्या मिनिटाला थापेलो मासेकोच्या शॉटला चेक बचावपटूच्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर पंचांनी पेनल्टी दिली. या संधीचा फायदा घेत तेबोहो मोकोएनाने चेंडू जाळ्यात धाडत सामना १-१ असा बरोबरीत आणला.


या निकालामुळे दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी एक गुण जमा झाला आहे. मात्र गटातील पुढील फेरीत स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांना आपले अखेरचे सामने जिंकणे जवळपास आवश्यक ठरणार आहे. (FIFA World Cup 2026 News)


दक्षिण आफ्रिकेचा पुढील सामना दक्षिण कोरिया (South Korea) विरुद्ध होणार आहे, तर चेक रिपलिकसह-यजमान मेक्सिको (Mexico) विरुद्ध कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.



सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ह्यूगो ब्रूस यांनी आपल्या संघाच्या कामगिरीचे कौतुक करत पुढील फेरी गाठण्याचा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे, चेक प्रशिक्षक मिरोस्लाव कौबेक यांनी अनेक संधी दवडल्यामुळे विजय हातातून निसटल्याची खंत व्यक्त केली.


अखेरच्या क्षणी मिळालेल्या गोलमुळे दक्षिण आफ्रिकेने महत्त्वाचा एक गुण वाचवला, तर चेक संघाला विजय न मिळाल्याची हुरहूर कायम राहिली. आता गट ‘अ’ मधील अंतिम सामने दोन्ही संघांचे भवितव्य ठरवणार आहेत.

Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे