देशभरात 'टेलिग्राम' ॲप २२ जूनपर्यंत ब्लॉक! NEET परीक्षेमुळे NTA चा निर्णय

टेलिग्रामवरील 'या' एका फीचरमुळे ॲप झालं बॅन!


संपूर्ण देशभरात २२ जूनपर्यंत 'टेलिग्राम' ॲप ब्लॉक करण्यात आले आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. पण अचानक केंद्र सरकारने हा निर्णय का घेतला? विशेषतः NEET परीक्षेच्या तोंडावर टेलिग्रामवर ही थेट कारवाई का करण्यात आली? थोडक्यात सांगते...



केंद्र सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'NTA' च्या शिफारसीवरून भारतात २२ जूनपर्यंत टेलिग्राम ॲप ब्लॉक केले आहे. इतकंच नाही, तर ३० जूनपर्यंत टेलिग्राममधील 'मेसेज एडिट' करण्याचे फीचरही पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. २१ जून रोजी होणाऱ्या NEET-UG २०२६ च्या फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पण प्रश्न हा आहे की, फक्त टेलिग्रामवरच ही कारवाई का? तर मित्रांनो, NTA ने दिलेल्या माहितीनुसार, या ॲपच्या 'एडिट फीचर'चा वापर करून पेपर फुटीचे खोटे पुरावे तयार केले जात होते. स्कॅमर्स काय करतात? परीक्षेच्या आधी ते चॅनेलवर एक साधा मेसेज टाकतात. परीक्षा झाल्यावर तोच मेसेज एडिट करून त्यात खऱ्या प्रश्नपत्रिकेचा फोटो टाकला जातो. टेलिग्रामवर मेसेज एडिट केल्यावरही मूळ वेळ बदलत नाही. त्यामुळे पाहणाऱ्याला असा भास होतो की, हा पेपर परीक्षेच्या आधीच लीक झाला होता! या अशा खोट्या पुराव्यांचा वापर करून विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक केली जात होती. टेलिग्रामवर उघडपणे "PAPER LEAKED NEET" आणि "Private Mafia" सारखी चॅनेल्स चालवली जात आहेत, जी बनावट प्रश्नपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून १४,००० ते २५,००० रुपयांची मागणी करतात. NTA ने स्पष्ट केले आहे की सुरक्षित साखळीच्या बाहेर कोणतीही प्रश्नपत्रिका गेलेली नाही आणि ही चॅनेल्स म्हणजे निव्वळ फसवणूक आहेत. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हालाही असे कोणते मेसेज येत असतील, तर त्या भूलथापांना आणि स्कॅमला अजिबात बळी पडू नका. २१ जूनच्या फेरपरीक्षेसाठी तुमचा वेळ फक्त आणि फक्त अभ्यासावर केंद्रित करा. ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसोबत आणि पालकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून कुणाचीही फसवणूक होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अचूक अपडेट्ससाठी प्रहार न्यूजलाईन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.

Comments
Add Comment

New Mahindra Car Launch: महिंद्राची नवी CNG SUV बाजारात! पाहा किंमत, फीचर्स आणि मायलेज

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय बाजारात महिंद्रा कंपनीने आपल्या ताफ्यात सीएनजी गाडी लाँच केली आहे. XUV 3XO CNG ही

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

11 लाख ग्राहकांचा विश्वास! TVS Radeon नव्या लूकमध्ये लॉन्च; पाहा फीचर्स आणि किंमत

सणासुदीच्या हंगामाचे औचित्य साधत टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) आपल्या अत्यंत लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस

Instagram MUSE AI feature : Instagram मध्ये आले नवीन 'MUSE' AI फीचर! शेअर मेन्यूमध्ये दिसणारे 'MUSE' काय आहे ? जाणून घ्या एका क्लिकवर!

इन्स्टाग्राम (Instagram) वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. सध्या इन्स्टाग्रामच्या शेअर

Airtel च्या ग्राहकांना मोठा दणका : पोस्टपेड प्लॅन ५० रुपयांनी महाग; पण फ्री मिळणार आंतरराष्ट्रीय रोमिंगचा फायदा

टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी Airtel ने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने

OPPO F35 Series भारतात लाँच; 8,000mAh बॅटरीसह दमदार फीचर्स!

टेकप्रेमींसाठी आनंदाची बातमी! Oppo ने नुकतीच आपली F35 सिरीज भारतात लाँच केली आहे. या नवीन सिरीजमध्ये Oppo F35 5G आणि Oppo F35 Pro 5G