भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोबाईल कॉलिंग प्रणालीमध्ये बदल केले आहेत. हे नवीन नियम १ जानेवारी २०२७ पासून लागू होतील. मोठ्या दूरसंचार कंपन्यांचा मनमानीपणा रोखणे आणि बाजारातील लहान व नवीन कंपन्यांना व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणे हा या नियमांचा उद्देश आहे. हे नवीन नियम काय आहेत आणि त्यांचा सामान्य मोबाईल ग्राहकांना कसा फायदा होईल? जाणून घ्या...
Jio आणि Airtel कॉलमध्ये इंटरकनेक्शन म्हणजे काय?
समजा तुमच्याकडे जिओ नंबर आहे आणि तुमच्या मित्राकडे एअरटेल नंबर आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला कॉल करता, तेव्हा तुमचं कॉल त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क जोडले जातात. दूरसंचार क्षेत्रात याला इंटरकनेक्शन म्हणतात. यासाठी दूरसंचार कंपन्यांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक कराराची आवश्यकता असते. ट्रायने आता या करारांशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे.
ट्रायच्या मते, कोणत्याही टेलिकॉम सर्कलमध्ये समायोजित सकल महसूल (AGR), ग्राहक संख्या, व्हॉइस कॉल हाताळण्याची क्षमता किंवा नेटवर्क ट्रॅफिकमध्ये ३०% किंवा त्याहून अधिक वाट असलेल्या कंपनीला महत्त्वपूर्ण बाजारशक्ती असलेली कंपनी मानली जाते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ट्राय बाजारावर लक्षणीय वर्चस्व असलेल्या कंपन्यांवर बारकाईने लक्ष ठेवेल. याचे मूल्यांकन प्रत्येक आर्थिक वर्षात केले जाईल.
Honda ALPHA चा नवा टीझर रिलीज ! 2 डिसेंबरला होणार ग्लोबल डेब्यू ; भारतातच होणार निर्मिती
होंडा कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीची सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे. Honda ALPHA असं या नव्या इलेक्ट्रिक एसयूव्हीचं नाव असून, ...
इंटरकनेक्शन कराराच्या अटी सार्वजनिक कराव्या लागणार
बाजारात लक्षणीय हिस्सा असलेल्या कंपन्यांना त्यांच्या इंटरसेक्शनच्या अटी मंजुरीसाठी ३० दिवसांच्या आत ट्राय कडे सादर करणे आवश्यक असेल. मंजुरी मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत या अटी ट्रायच्या वेबसाईटवर सार्वजनिक केल्या जातील. यामुळे नवीन आणि लहान कंपन्यांना मोठ्या कंपनीच्या नेटवर्कशी जोडणी करण्याच्या आवश्यकतांची माहिती मिळेल. तथापि, दोन्ही कंपन्यांना परस्पर संमतीने या अटींमध्ये बदल करता येईल.
नियमांचे उल्लंघन केल्यास टेलिकॉम कंपन्यांना दंड
ट्रायने नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर दंड आकारण्याची तरतूदही केली आहे. वेळेवर माहिती न देणे, कराराच्या अटी सार्वजनिकरित्या उघड न करणे किंवा आवश्यक बदल न केल्यास कंपन्यांवर कारवाई केली जाईल. दंड निश्चित करताना, कंपनीने किती कालावधीपासून नियमांचे पालन केलेले नाही, याचाही विचार केला जाईल.