गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. प्रेम दीपक आदमाने (वय १९, रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे त्याचे नाव असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली.



उर्वरित चार पर्यटकांचा शोध घेण्यासाठी प्रशासन, पोलीस, जीवरक्षक, स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार यांच्याकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाडे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच शोधमोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.दरम्यान, प्रेम आदमाने हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर आली असून या दुर्घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.प्रशासनाने पर्यटकांना समुद्रातील धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन खोल पाण्यात न जाण्याचे आणि जीवरक्षकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.