Eknath Shinde : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायासाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निर्देशानंतर सीबीआय उच्च न्यायालयात करणार अपील
मुंबई : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांचे सुपूत्र आणि बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी शिंदे यांनी लावून धरली. त्यानंतर अमित शाह यांनी सीबीआयला तात्काळ उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचे निर्देश दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली.



पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हत्येचे प्रकरण राज्यातील सर्वाधिक गाजलेल्या हत्याकांडांपैकी एक मानले जाते. गेली दोन दशके हा खटला सीबीआय न्यायालयात सुरू होता. या कालावधीत पीडित कुटुंबीयांसह जनतेलाही आरोपींना शिक्षा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने ओमराजेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणाचा निकाल लागला, तेव्हा कोल्हापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा सुरू होती. या सभेदरम्यान शिंदेंना निकालाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी व्यासपीठावरून बाजूला होत फोनद्वारे संबंधितांशी चर्चा केल्याचे कळते.



यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "हे अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरण आहे. पीडित कुटुंबीयांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडला. या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असून, कायदेशीर लढाई पुढे सुरू राहील. सत्य बाहेर यावे आणि पीडित कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल," असेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.