Gold Silver Rate : आनंदवार्ता! एका दिवसात सोनं ४,६०० तर चांदी १२,००० रुपयांनी स्वस्त

मुंबई : सोन्या-चांदीच्या दरात आज एकाच दिवसात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. सोन्याच्या दरात तब्बल ४,६०० रुपयांची घट झाली असून दर १,४४,९०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर चांदीच्या दरात १२,००० रुपयांची मोठी घसरण होऊन ती २,३७,००० रुपयांवर आली आहे. या अचानक झालेल्या घसरणीमुळे बाजारात चर्चेला उधाण आले आहे.


जळगावातील सुवर्ण व्यावसायिक सुशील बाफना यांनी या घसरणीमागील कारणांवर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या

">मते सोनं-चांदीच्या दरात घसरण होण्यामागे जागतिक आणि देशांतर्गत अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहे.



जागतिक कारणांचा मोठा प्रभाव :


अमेरिका-इराण तणाव आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम यामुळे अनेक देशांच्या आर्थिक स्थितीवर दबाव निर्माण झाला आहे. परिणामी विविध देशांकडून सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील सोन्याची खरेदी थांबली आहे. याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबतची अनिश्चितता आणि अपेक्षित बदल न झाल्यानेही गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.



देशांतर्गत मागणी घटली :


देशात सध्या लग्नसराई नसल्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “अनावश्यक सोने खरेदी टाळा” या आवाहनालाही काही प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने खरेदीत घट झाल्याचे सांगितले जात आहे. मागणी कमी झाल्यामुळे दरांवर थेट दबाव आला आहे.



एका दिवसातील मोठी घसरण :


इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार:


१८ जून रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर: ₹१,४८,०९३
१९ जून रोजी दर: ₹१,४४,९७०
एका दिवसात ₹३,१२३ ची घसरण


तर


२२ कॅरेट सोन्याचा दर: ₹१,३५,६५३
नवा दर: ₹१,३२,७९३
₹२,८६० ची घट


चांदीच्या दरात तब्बल ₹१२,००० ची घसरण नोंदवली गेली आहे.



बाजारात अनिश्चिततेचे वातावरण :


तज्ज्ञांच्या मते सध्या जागतिक आर्थिक घडामोडी, व्याजदरातील अनिश्चितता आणि देशांतर्गत मागणीतील घट यामुळे सोन्या-चांदीच्या बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.

">पुढील काही दिवसांत दर स्थिर होतात की आणखी बदल होतो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई