Agriculture Minister Dattatray Bharne : राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरणः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे


राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा


मुंबई, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात आला. राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.


मुंबई येथून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,००० इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.



कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. महाराष्ट्रातील ९० लाखांहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात २३ व्या हप्त्याचा लाभ थेट जमा करण्यात आला असून यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता वेळेवर वितरित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांतर्फे आभार व्यक्त करतो.”


महाराष्ट्रातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत २२ हप्त्यांद्वारे सुमारे ₹४१,०८३ कोटींचा लाभ वितरित करण्यात आला आहे. यंदाच्या २३ व्या हप्त्यात राज्यातील भूमी अभिलेख अद्ययावत, आधार संलग्न बँक खाते व ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे ₹१,८१७ कोटींचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे मिळणार आहे.पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक करण्यात आले होते.



या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका कृषी कार्यालये, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघटना तसेच सहकारी संस्थांमध्ये आयोजित करण्यात आले.


केंद्र शासनाने २० जून हा दिवस देशभर ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कृषी विभाग, महसूल व वन विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.



पीएम किसान योजेनेचे सर्वाधिक लाभार्थी असलेले पहिले पाच जिल्हे


अहिल्यानगर (लाभार्थी 5,45,481 व एकूण रक्कम 109.32)
सोलापूर (लाभार्थी 4,94,447 व एकूण रक्कम 98.89)
कोल्हापूर (लाभार्थी 4,60,687 व एकूण रक्कम 92.19)
सातारा (लाभार्थी 4,36,055 व एकूण रक्कम 87.22)
पुणे ( लाभार्थी 4,30,519 व एकूण रक्कम 86.10)
नाशिक (लाभार्थी 4,26,540 व एकूण रक्कम 85.34)

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.