Narcotics seized : पुण्याच्या वाकड येथे फूड डिलिव्हरी बॉयकडून अंमली पदार्थ जप्त

पुणे : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या एका तरुणाला एमडी (मॅफेड्रॉन) पावडरची विक्री करताना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी रात्री सुमारे 8.45 वाजता वाकड परिसरात ही कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून अंमली पदार्थांसह एकूण 1 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार संदीप गवारी यांनी फिर्याद दिली आहे. निसार अकबर मुजावर (वय 26, गुजर नगर, थेरगाव; मूळ रा. तुळजापूर, धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निसार मुजावर हा फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो वाकड परिसरातील एका मोकळ्या मैदानात 7.60 ग्रॅम वजनाची, सुमारे 38 हजार रुपये किमतीची पांढरट रंगाची एमडी (मॅफेड्रॉन) पावडर विक्रीसाठी घेऊन आला होता.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एमडी पावडर, प्लास्टिक पिशव्या, एक मोबाईल फोन आणि मोपेड दुचाकी असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.प्राथमिक तपासात आरोपी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणातील आणखी धागेदोरे शोधण्यासाठी वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments
Add Comment

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित