Nashik : उन्नत नाशिक अभियानांतर्गत “मिशन ग्रीन मान्सून” उपक्रम; मंत्री गिरीश महाजन यांची संकल्पना

Nashik : ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत नाशिक शहर व परिसरात ‘हरित कुंभ-हरित मान्सून’ (‘Green Kumbh – Green Monsoon’) अर्थात “मिशन ग्रीन मान्सून” (“Mission Green Monsoon”) राबवून २०२६ च्या मान्सून हंगामात १ लाख देशी वृक्षांची लागवड व संवर्धन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याबाबत नामदार गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत.



‘स्वच्छ, हरित व सुंदर नाशिक’


‘स्वच्छ, हरित व सुंदर नाशिक’ (‘Clean, Green, and Beautiful Nashik’) या संकल्पनेवर आधारित उन्नत नाशिक अभियान १ मे २०२६ पासून सुरू करण्यात आले असून स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि हरित उपक्रमांवर विशेष भर दिला जात आहे. अभियानांतर्गत १७ मे रोजी महापालिका क्षेत्रात ४ हजारांहून अधिक देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) नंदिनी नदी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे (Padmashri Rahibai Popere) यांची बीजतुला करण्यात आली असून त्यातून संकलित बियाण्यांचा वापर वृक्षारोपणासाठी केला जाणार आहे.



मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणार


वाढते तापमान, हवामान बदल आणि पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीने ‘मिशन ग्रीन मान्सून’ अंतर्गत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेचा कालावधी २८ जून ते २५ ऑक्टोबर २०२६ असा असून मान्सून काळातील प्रत्येक रविवारी नियोजनबद्ध वृक्षारोपण केले जाईल. यासोबत सीड बॉल तयार करून रोपण तसेच कुसमाडी पॅटर्नद्वारे वृक्षलागवडीवरही भर दिला जाणार आहे.


या उपक्रमात सर्व शासकीय-निमशासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग-व्यवसाय, विविध संघटना, क्रीडा व करिअर अकॅडमी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. प्रत्येक विभाग व संस्थेला त्यांच्या क्षमतेनुसार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्याबाबतही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कुंभमेळा प्राधिकरण, महानगरपालिका, विविध शासकीय-निमशासकीय विभाग, सामाजिक संस्था, निसर्गप्रेमी व माध्यम प्रतिनिधींची “मान्सून वृक्ष लागवड समिती” स्थापन करण्यात येणार आहे.



मंत्री गिरीश महाजन म्हणाले...


नाशिककरांच्या लोकसहभागातून नंदिनी स्वच्छतेनंतर आता ‘मिशन ग्रीन मान्सून’मुळे कुंभमेळ्यापूर्वी ( Kumbh Mela ) नाशिक खऱ्या अर्थाने हरित व सुंदर बनण्यास सुरुवात होईल. प्रत्येक रविवारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वृक्षलागवडीबरोबरच वृक्षसंवर्धनासाठीही सामूहिक प्रयत्न करावेत.”

Comments
Add Comment

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला