Water hyacinth : पवई तलावातील जलपर्णी आता कायमची हद्दपार..

तलावाच्या विहार पथाचा विकास सी एस आर निधीतून..


मुंबई: मुंबई महापालिकेच्या पवई तलावात सांडपाण्याच्या प्रवाहामुळे यातील जलपर्णी आणि मगरींचा त्रास मोठ्याप्रमाणात होत आहे. हा त्रास आता कायमचाच दूर होणार आहे. यातील सांडपाणी प्रवेशाचे मार्ग आता कायमचेच बंद होत आहे. येत्या जून अखेरपर्यंत हे मार्ग पूर्णपणे बंद होवून यातील पाण्याचा दर्जा सुधारला जाणार आहे. परिणामी या तलावातील या सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या जलपर्णी आणि मगरींचा त्रास कायमचाच दूर होणार आहे. दरम्यान, या पवई तलावातील पाण्यावर कारंजे बसवले जाणार असून हे काम म्हाडाच्यावतीने केले जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.


पवई तलावाच्या दक्षिण बाजूस आदि शंकराचार्य मार्गालगत परिसराचा मागील १८ वर्षांपासून विकास रखडलेला असून आता याठिकाणी मेट्रो रेल्वेच्या स्थानकांची कामे पूर्ण होताच याचा विकास करण्यात येत आहे. या परिसराचे सुशोभिकरणाचे काम पूर्ण करण्यात आल्यांनतर पर्यटकांसाठी तिकीट आकारणी करण्यात येणार आहे, तसेच अंतर्गत भागांमध्ये फूड कोर्टद्वारे खाद्यपदार्थांची विक्रीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कामासाठी सल्लागार नेमणुकीचा प्रस्ताव आला असता,सदस्यांनी सल्लागार नियुक्तीवर आक्षेप घेतला. अश्रफ आझमी यांनी जी सल्लागार कंपनी नेमली त्याचा अनुभव काय आहे असा सवाल याच्या विकासाचा विस्तृत अहवाल सादर करण्याची मागणी केली. तर सईदा खान यांनी पवई तलावातील मगरींना सुरक्षित राणीबागेत स्थलांतरीत करावे अशी सूचना केली. तर यशोधर फणसे यांनी निविदा न काढता यासाठी सल्लागार कसा नेमला जात आहे असा सवाल कर यामध्ये एका विकासकाने मगरी सोडल्याचा आरोप केला. यावेळी झालेल्या चर्चेत शीतल गंभीर, अजंता यादव, मिनाक्षी पाटणकर यांनी सहभाग घेतला.


यावेळी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पवई तलावाची सुधारणा आणि प्रोमिनाड अर्थात विहार पथ आदींची कामे स्वतंत्र होत आहे. या पवई तलाव आणि आदी शंकराचार्य मार्ग मधील जागेचा विकास करण्यात येत असून यामुळे कोस्टल रोडच्या धर्तीवर एक विहार पथ उपलब्ध होणार आहे. या विहार पथाचा विकास खासगी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने सीएसआर निधीतून केला जाणार आहे.तसेच पवई तलावाची सुधारणा विविध तज्ज्ञ समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार तथा त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून पवईत ज्या भागातून सांडपाणी प्रवेश होते, ते प्रवेश मार्ग आता बंद करण्यात येत आहेत. यामध्ये १८ दशलक्ष लिटर सांडपाणी अर्थात मलजल येत असते. त्यामुळे ३० जूनपर्यंत हे १८ प्रवेश मार्ग बंद करण्यात येत आहेत. हे सर्व प्रवेशमार्ग शोधून बंद करण्यात येत आहे. येत्या १ जुलैपासून हे प्रवेशमार्ग बंद झाल्यामुळे सांडपाण्याचा प्रवाह बंद होईल. ज्यामुळे जलपर्णी जी अधिक या पाण्यावर वाढते, ते प्रमाण कमी होईल,असे बांगर यांनी स्पष्ट केले.तसेच तलावातील कारंजे बंद असून हे कारंजे पूर्वव्रत केले जाणार आहेत. या कांरजा बसवण्याचे काम म्हाडाच्या माध्यमातून केले जाणार आहे,असेही बांगर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा