FIFA World Cup 2026 : सुपरफास्ट वर्ल्डकप, फक्त ३३ सामन्यांत घडली अनोखी घटना

Mumbai : फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये फक्त ३३ सामन्यांत १०० गोलची नोंद झाली आहे. याआधी १९८२ आणि २०१४ मध्ये ३६ सामन्यांत तर १९७८ आणि १९९४ मध्ये लागलेल्या ३८ सामन्यांत १०० गोल झाले होते. स्वित्झर्लंडमध्ये १९५४ मध्ये अवघ्या २० सामन्यांत १०० गोल झाले होते. तो वर्ल्ड कप पश्चिम जर्मनीने जिंकला होता.


मेक्सिकोच्या ज्युलियन क्विनोनेसने १२ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विश्वचषकातील पहिला गोल केला होता. अवघ्या १० दिवसांत फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये १०० गोलची नोंद झाली आहे. रविवारी (२१ जून, भारतीय वेळेनुसार) स्वीडनविरुद्धच्या सामन्यात नेदरलँड्सने तिसरा गोल करून स्पर्धेतील १०० वा गोल नोंदवला.स्वीडनविरुद्धच्या सामन्यांत नेदरलँड्सने ५-१ असा विजय मिळवला.फिफा वर्ल्ड कपमध्ये १०० व्या गोलची नोंद करणारा नेदरलँड्स हा फुटबॉल विश्वातील आठवा संघ आहे. सामना सुरू होऊन जेमतेम पाच मिनिटे झाली असतानाच, नेदरलँड्सने स्वप्नवत सुरुवात केली, कारण ब्रॉबीने गाक्पोच्या एका अप्रतिम क्रॉसवर गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर १७ व्या मिनिटाला ब्रॉबीने आपला दुसरा गोल केला, जो विश्वचषकातील नेदरलँड्सचा १०० वा गोल ठरला आणि एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली.



फिफा वर्ल्ड इतिहासातील १००० वा सामना


मॉन्टेरी स्टेडियमवर जपान आणि ट्युनिशिया यांच्यात झालेला गट 'फ' अर्थात ग्रुप एफ मधील सामना हा फिफा विश्वचषक इतिहासातील हजारावा सामना ठरला आहे. उत्तर अमेरिकेत होणाऱ्या फिफा विश्वचषक २०२६ मध्ये ४८ सहभागी देश असून, त्यांची १२ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ, तसेच तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम आठ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.



रविवार २१ जून २०२६ - फिफा वर्ल्ड कपमधील सामन्यांचे निकाल


जर्मनी विरुद्ध कोट डी आयव्होर - जर्मनीचा २-१ ने विजय


इक्वेडोर विरुद्ध कुराकाओ - ०-० बरोबरीत सुटला


ट्युनिशिया विरुद्ध जपान - जपानचा ४-० ने विजय


स्पेन विरुद्ध सौदी अरेबिया - रविवारी रात्री ९.३० वाजता होणार

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून