Ulhasnagar Lizard In Manchurian : उल्हासनगरात धक्कादायक प्रकार! मंचुरियनमध्ये पालीचे पिल्लू

मुंबई : अन्नसुरक्षेचा (Food Safety) गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये एका चायनीज सेंटरमधून (Chinese Centre) खरेदी केलेल्या मंचुरियनमध्ये (Manchurian) चक्क पालीचे मेलेले पिल्लू (Dead Lizard Hatchling) आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे मंचुरियन खाल्ल्यानंतर एका तरुणीची प्रकृती बिघडली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात राहणाऱ्या मोना पठारे यांनी शुक्रवारी सायंकाळी सुभाष टेकडी मच्छी मार्केट (Fish Market) परिसरातील एका चायनीज फूड विक्रेत्याकडून (Chinese Food Vendor) मंचुरियन घरी आणले होते. मंचुरियन खात असताना त्यामध्ये पालीचे मेलेले पिल्लू आढळल्याने त्या हादरल्या.



यानंतर त्यांनी संबंधित विक्रेत्याकडे जाऊन याबाबत जाब विचारला. मात्र, विक्रेत्याने ‘चटणी टेस्टिंगसाठी (Testing) पाठवतो, पण ही बाब कोणाला सांगू नको,’ असे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, रात्री मोना पठारे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय देखरेख (Medical Observation) ठेवण्यात आली आहे.



या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून ग्राहकांच्या आरोग्याशी (Consumer Health) खेळ करणाऱ्या अशा फास्ट फूड (Fast Food) आणि चायनीज पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई (Strict Action) करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration - FDA) या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण