Pune Crime : किरकोळ वादाचे हिंसक रूपांतर; पुण्यात गुंडाकडून हल्ल्याचा प्रयत्न

Pune Crime : पुणे :  पुण्यातील (Pune) पाटील इस्टेट परिसरात एका किरकोळ वादातून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट दहशतीत झाले. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, पाटील इस्टेट येथील गल्ली क्रमांक 10 मध्ये ही घटना घडली. रस्त्यावर वाहन बाजूला घेण्यावरून दोन पक्षांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान जुनी राजसिंग युवराज सिंग या सराईत गुन्हेगाराने आक्रमक भूमिका घेत हातात धारदार शस्त्र उचलले. त्याने समोरच्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. (Pune Police)


घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही महिलांनी धाडस दाखवत आरोपीला रोखले. त्यांनी त्याच्या हातातील शस्त्र हिसकावून घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र यानंतरही आरोपीने परिसरातील नागरिकांना धमकावत गोंधळ घातला.


प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आरोपीने "मी इथला भाई आहे, मी जे सांगेल तेच इथल्या लोकांनी ऐकायचे," असे म्हणत नागरिकांना धमकावले. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.  (Pune Police Action)



पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या हालचालींबाबत माहिती गोळा करण्यात येत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी