Kolhapur : कोल्हापुरात नवीन उद्योगांना बळ

 ४७.६३ हेक्टर शासकीय गायरान जमीन एमआयडीसीला; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय


मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मौजे टाकळी येथील एकूण ४७.६३ हेक्टर शासकीय व गायरान जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान करण्यास मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.



या निर्णयानुसार, मौजे टाकळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील गट क्रमांक १३५० मधील १२.८६ हेक्टर गायरान जमीन, १५.०० हेक्टर शासकीय जमीन तसेच गट क्रमांक ११९४ मधील १९.७७ हेक्टर गायरान जमीन अशी एकूण ४७.६३ हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात येणार आहे. जमीन औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी वापरण्यात येणार असून, या जमिनीचे कृषिक दराने प्रचलित बाजारमूल्यानुसार मूल्य निश्चित करून त्याची संपूर्ण रक्कम एमआयडीसीकडून वसूल करण्यात येणार आहे. ही जमीन एमआयडीसीला भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने आणि कब्जेहक्काने प्रदान करण्यात येणार आहे.



याविषयी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात औद्योगिक विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूरसारख्या प्रगत जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. या निर्णयामुळे शिरोळ परिसरात औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. राज्यातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या जमीन उपलब्धतेच्या प्रक्रियेला शासन अधिक गतिमान करत आहे."

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी