राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण

संपूर्ण मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत पूर्ण


 कुठल्याही अनुचित प्रकाराची नोंद नाही


मुंबई : राज्यातील १४ जिल्ह्यातील ८ नगर परिषदा व १४ नगर पंचायतीमधील एकूण ४७ रिक्त पदांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यापैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून तिर्थपुरी नगरपंचायतीतील एका जागेसाठी नामनिर्देशन प्राप्त न झाल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे उर्वरित ३८ जागांसाठी मतदान घेण्यात आले.



राज्यातील १० जिल्ह्यांतील ७ नगर परिषद व ७ नगरपंचायतींमधील रिक्त पदांसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी ७२.१२ टक्के, तर पोटनिवडणुकांसाठी ७१.५५ टक्के मतदान झाले. या सार्वत्रिक तसेच पोट निवडणुकीकरिता एकूण ४० हजार ८६९ मतदार होते. त्यापैकी २० हजार ३५४ पुरूष मतदार तर २० हजार ५१५ स्त्री मतदार होते. या सार्वत्रिक निवडणुकीत ११ हजार ८२१ पुरूष मतदारांनी आणि १० हजार ८५३ स्त्री मतदारांनी मतदान केले तर पोट निवडणुकीसाठी ३,३२४ पुरूष आणि ३,४१९ स्‍त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


या निवडणुकांसाठी राज्यभरात ५१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. मतदान प्रक्रियेसाठी ५१ ईव्हीएम यंत्रे तसेच तेवढ्याच संख्येने बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटचा वापर करण्यात आला. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्याचा अहवाल प्राप्त झाला नसून सर्व मतदान केंद्रांवर मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडली.त्याचप्रमाणे, आज दिनांक २१ जून २०२६ रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल घोषित केले आहे.या नगरपंचायत / नगरपरिषदेच्या सार्वत्रिक तसेच पोट निवडणुकीत मतदान तसेच मतमोजणी दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नसून सर्व ठिकाणी शांततेत मतदान व मतमोजणी पूर्ण झाली, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले आहे

Comments
Add Comment

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री