Varun Chakravarthy : आयर्लंड विरूद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का ! स्टार गोलंदाज संघातून बाहेर

Mumbai : भारतीय संघाने घरच्या मैदानावर शानदार खेळ करत अफगाणिस्तान विरुद्धचा एकमेव कसोटी सामना तसेच तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली आहे. आता भारत आर्यंलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २६ जून तर दुसरा सामना २८ जून ला होणार आहे. यासाठी बीसीसीआयने आधीच संघाची घोषणा केली आहे. पण ही स्पर्धा सुरू होण्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे.आयर्लंड विरूद्धच्या सामन्यांसाठी संघात निवड झालेल्या वरुण चक्रवर्तीला दुखापतीमुळे स्पर्धा सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. वरुण आंतरराष्ट्रीय टी-२० तील नंबर वन गोलंदाज आहे. तोच खेळणार नसल्यामुळे टीम इंडियाच्या नियोजीत डावपेचांना धक्का बसला आहे.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी (२१ जून) एक निवेदन जाहीर केले, ज्यामध्ये बीसीसीआयने सांगितले की, वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे आयर्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. बीसीसीआयच्या निवेदनानुसार, आयपीएल २०२६ मध्ये डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर झाला आहे. तो सध्या बीसीसीआयच्या सीओई येथे फिटनेसवर काम करत आहे. तसेच वरुणच्या जागी कोण खेळणार? हे अद्याप बीसीसीआयने स्पष्ट सांगितलेले नाही.आयपीएल २०२६ मध्ये पायाला हेअरलाइन फ्रॅक्चर होऊनही वरुणने गुजरात टायटन्सविरुद्ध आपली चारही षटके टाकल्यामुळे तो टीकेचा धनी झाला होता. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या करा किंवा मरा सामन्यात त्याने चार षटके टाकताना ४७ धावा देत एकही विकेट घेतली नव्हती. त्यावेळी त्याला त्याच्या नेहमीच्या पातळीवर गोलंदाजी करणे कठीण गेले आणि त्याचा फॉर्मही गायब झाल्याचे दिसले.



आयर्लंड टी20 मालिकेसाठी भारताचा सुधारीत संघ-


श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसिध्द कृष्णा



आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये वरुण चक्रवर्तीची कामगिरी


वरुण चक्रवर्तीने भारतासाठी ४५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून, यात त्याने १६.६२ च्या उत्कृष्ट सरासरीने आणि ७.५६ च्या इकॉनॉमी रेटने ७३ बळी घेतले आहेत. आपल्या गूढ फिरकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वरुणची आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वोत्तम कामगिरी १७ धावांत पाच बळी अशी आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत दोन वेळा ४ बळी आणि दोन वेळा ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. टी२० विश्वचषकातही त्याने भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असून, तेथे १५ सामन्यांमध्ये ८.५२ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना सात धावांत तीन बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. वरुण संघात नसल्याने भारताच्या फिरकी विभागाची अधिक जबाबदारी अक्षर पटेलवर असेल.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून