Rhea Kapoor : मेट गालासाठी गेली अन् धक्कादायक घडलं; सहार पोलिसांत गुन्हा दाखल

 मेकअप आर्टिस्टच्या हँडबॅगमधून कोट्यवधींचे दागिने गायब



मुंबई: मुंबईतील सहार पोलीस (Sahaar Police Station) ठाण्यात 1.35 कोटी रुपयांच्या किमतीचे हिरेजडित कानातले चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मेकअप आर्टिस्ट सवलीन सिंग (Savleen Singh) यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तपास सुरू केला आहे.


सवलीन सिंग या गेल्या सात वर्षांपासून चित्रपट निर्माती आणि फॅशन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व रिया कपूर यांच्यासोबत काम करत आहेत. मेट गाला (MET Gala ) 2026 या प्रतिष्ठित फॅशन कार्यक्रमासाठी रिया कपूर यांना निमंत्रण मिळाले होते. या कार्यक्रमासाठी त्यांची संपूर्ण टीम मुंबईहून न्यूयॉर्कला रवाना झाली होती.



प्रवासादरम्यान रिया कपूर (Riya Kapoor) यांच्यासाठी मेहता ज्वेलर्स आणि गोएंका ज्वेलर्स यांच्याकडून भाड्याने घेतलेले महागडे कानातले सवलीन सिंग यांच्याकडे सुरक्षित ठेवण्यात आले होते. त्यांनी हे दागिने आपल्या हँडबॅगमध्ये ठेवले होते.


27 एप्रिल रोजी टीम मुंबईहून दुबईमार्गे न्यूयॉर्कला रवाना झाली. 28 एप्रिल रोजी न्यूयॉर्कमध्ये (New York) पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये सामान तपासताना सवलीन यांना दागिन्यांचे बॉक्स रिकामे असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती संबंधितांना दिली.



चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये मेहता ज्वेलर्सचे एमराल्ड आणि डायमंड जडित सोन्याचे कानातले असून त्यांची किंमत सुमारे 66 लाख रुपये आहे. तसेच गोएंका ज्वेलर्सचे जाम्बियन एमराल्ड असलेले कानातले सुमारे 69 लाख रुपयांचे असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही दागिन्यांची एकूण किंमत 1.35 कोटी रुपये आहे.


सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दागिन्यांची चोरी नेमकी मुंबई-दुबई, दुबई-न्यूयॉर्क प्रवासादरम्यान झाली की अन्यत्र, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’