Gold Rate Today : ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्याच्या भावात मोठी कपात

सोने-चांदी (Gold And Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार सुरू असताना आज सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर तब्बल ४ हजार रुपयांनी कमी झाले असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे चांदीचे दर स्थिर राहिले आहेत. (Gold Rate Today)



आजचे सोन्याचे दर 


आज २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर १,४६,५१० रुपयांवर आला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर १,३४,३०० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर १,०९,८८० रुपये इतका आहे. गेल्या काही दिवसांतील वाढीनंतर आलेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष पुन्हा सोन्याकडे वळले आहे. ( Gold Price Today)


मुंबई आणि पुण्यात सोन्याचे दर समान आहेत. या दोन्ही शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १४,६५१ रुपये प्रति ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा दर १३,४३० रुपये प्रति ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचा दर १०,९८८ रुपये प्रति ग्रॅम आहे. दिल्लीमध्ये मात्र सोन्याचे दर किंचित जास्त असून २४ कॅरेट सोन्याचा दर १४,६६६ रुपये प्रति ग्रॅम नोंदवला गेला आहे.




 

चांदीचे भाव 


चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. १ ग्रॅम चांदीचा दर २५० रुपये असून १० ग्रॅम चांदीसाठी २,५०० रुपये मोजावे लागत आहेत. तर 1 किलो चांदीचा दर २,५०,००० रुपये इतका आहे. (Gold Price Drop Today)


तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या हालचालींमुळे सोन्या-चांदीच्या दरात पुढील काही दिवसांत आणखी बदल होऊ शकतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारातील ताजे दर तपासून घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी