Sanjay Dina Patil : एका व्यक्तीच्या त्रासामुळे मी पक्ष सोडला ; खासदार संजय दिना पाटील यांचा आरोप

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाले. उबाठाच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत असल्याचे जाहीर करत शिवसेनेत प्रवेश केला. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रम उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.



खासदार संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया

पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी उबाठा सोडण्याचे कारण सांगितले. त्यांनी थेट नाव घेणे टाळले पण चतुराईने संजय राऊतांकडेच इशारा केला.संबंधित व्यक्तीबद्दल आपण पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रार केली. पण आपल्या बाजूने निर्णय घेण्यात आला नाही किंवा आपल्या अडचणीवर तोडगा काढण्यात आला नाही. म्हणून हा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले.

मला ठाकरे कुटुंबीयांचा त्रास नव्हता

"मला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर जी नेतेमंडळी आहेत, त्यांच्याबद्दल कोणताही प्रोब्लेम नाही. सगळ्यांनी मला मान-सन्मान दिलेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांना मान-सन्मान दिलेला आहे. मी पण तेवढ्याच गोष्टी करतो. कुणी मला एक रुपया करतो तर मी शंभर रुपये करतो. तेवढं केलेलं आहे", असं संजय दिना पाटील म्हणाले. मात्र एका व्यक्तीमुळे हे सर्व झालं असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.



पक्षाचे मालक कोण आहेत ?

संजय दिना पाटील म्हणाले "काल आपण सुप्रिया ताईंच्या मुलीच्या लग्नात बघितलं असेल, पक्षाचे मालक बदली झाले आहेत ना? सुप्रिया ताईंच्या मुलीच्या लग्नात येताना बघितलं ना तुम्ही, पक्षाचे मालक कोण आहेत ?","एक व्यक्ती आम्हा सर्वांना डिस्टर्ब करत आहे. आम्ही कुठल्या कार्यक्रमात जाऊ शकत नाहीत. आम्ही खासदार झाल्यावरही निधी वापरू शकत नाहीत. कोण शाखाप्रमुख माझ्याकडे येऊ शकत नाही. मला कार्यक्रमाला बोलवू शकत नाही. कारण काहीही सांगतात आणि नंतर इकडे येऊन सांगतात की कार्यक्रमाला येत नाही.

उद्धव यांनी हे आधी करायला हवं होत

उद्धव ठाकरे आता सर्व खासदारांच्या मतदारसंघात जात आहेत. पण हेच आधी आले असते, तर आता येण्याचीदेखील गरज पडली नसती. मला ज्या व्यक्तीकडून त्रास आहे त्याला सुनावलं असतं तर ही वेळच आली नसती ना? मी शिवसेनेत प्रवेश केला नसता तर इतरांचाही प्रवेश झाला नसता. मला बोलावून घेतलं असतं, आम्ही जे सांगत होतो, जिथे येऊन मला शिव्या दिल्या तिकडे येऊन माफी मागा. मी त्यांच्याबरोबर 'मातोश्री'वर गेलो असतो. विषय संपला असता. पण त्यांना ते करायचंच नाही. त्यांना ताकदवान लोकं नको. त्यांना गुलाम लोकं पाहिजेत", अशी टीका संजय दिना पाटील यांनी केली.
Comments
Add Comment

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात