Women's Cricket : महिला क्रिकेटपटूंसाठी ICC ने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : खेळपट्ट्यांवर चौकार-षटकार मारणारी एखादी खेळाडू जेव्हा आई होण्याचा निर्णय घेते, तेव्हा बऱ्याचदा तिला तिच्या कारकिर्दीला पूर्णविराम द्यावा लागतो. खेळ आणि मातृत्व या दोन वेगवेगळ्या वाटांवरून चालताना होणारी तिची ओढाताण आता थांबणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला क्रिकेटपटूंसाठी 'प्रसूतीनंतर पुनरागमन' ही अत्यंत संवेदनशील आणि व्यावहारिक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. आई झाल्यानंतरही महिला खेळाडू सन्मानाने आणि सुरक्षितपणे पुन्हा मैदानावर परतू शकतील, हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.


आज महिला क्रिकेट मोठ्या उंचीवर पोहोचले आहे. खेळात करिअर घडवत असतानाच, अनेक खेळाडू आई बनून कुटुंब सुरू करण्याचा आनंदही घेऊ इच्छितात. पण बाळाच्या जन्मानंतर पुन्हा आधीसारखंच तंदुरुस्त होऊन मैदानात उतरणं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सोपं नसतं. खेळाडूंची हीच अडचण ओळखून आयसीसीने त्यांच्या आरोग्याची आणि कल्याणाची संपूर्ण जबाबदारी घेणारे हे पाऊल उचलले आहे.



महिला खेळाडूला आई होण्याच्या प्रवासापासून ते पुन्हा मैदानात पहिली धाव घेईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देण्यासाठी '६ आर' चा एक विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या डॉक्टर फिलिपा इंगे यांच्या नेतृत्वाखाली ही नियमावली तयार झाली आहे. यात केवळ खेळाचाच विचार नाही, तर एका आईच्या व्यावहारिक गरजाही जपल्या आहेत. सरावाच्या वेळात लवचिकता असणे, स्टेडियमवर बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा त्याची काळजी घेण्यासाठी हक्काची आणि सुरक्षित जागा असणे, आणि प्रवासातही बाळाला सोबत ठेवण्यासाठी मदत करणे, अशा अनेक कौतुकास्पद बाबींचा यात समावेश आहे.


'६ आर' चा आधार
१. रेडी : प्रसूतीनंतर आईच्या शरीराला मिळणारा विश्रांतीचा पहिला टप्पा.
२. रिव्ह्यू : तिची शारीरिक आणि मानसिक प्रकृती नेमकी कशी आहे, याची वैद्यकीय तपासणी.
३. रिस्टोर : गमावलेली शारीरिक क्षमता आणि ऊर्जा हळूहळू परत मिळवणे.
४. रिकंडिशन : घाई न करता, शरीराला झेपेल अशा संथ गतीने सराव सुरू करणे.
५. रिटर्न : पुन्हा बॅट-बॉल हाती घेऊन क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात येणे.
६. रिफाईन : ती संघात परतल्यानंतरही तिच्या आरोग्याची आणि तिच्या बाळाची सतत काळजी घेणे.




"मातृत्व आणि देशाचे प्रतिनिधित्व; आता दोन्हींची निवड करता येईल"
२०२१ मध्ये मुलाला जन्म देऊन आता २०२६ च्या विश्वचषकात वेस्ट इंडीजकडून खेळणारी अफी फ्लेचर आपली भावना व्यक्त करताना म्हणाली, "प्रसूतीनंतर शारीरिक सुदृढता मिळवणे कठीण होतेच, पण त्याहूनही कठीण होते आपल्या लहान बाळाला घरी सोडून मैदानात जाणे. आयसीसीच्या या धोरणामुळे आता कोणत्याही महिला खेळाडूला तिचे कुटुंब आणि स्वप्न यांपैकी एकाचीच निवड करावी लागणार नाही."
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनीही या निर्णयाचे मनापासून स्वागत केले. ते म्हणाले, "कोणत्याही महिला खेळाडूवर आई होण्यासाठी देश सोडून देण्याची वेळ येऊ नये. हा निर्णय केवळ नियमांचा नाही, तर आमच्या खेळाडूंच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर त्यांची काळजी घेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. महिला खेळाडूंनी मैदानावर आणि मैदानाबाहेरही आनंदाने जगावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून