Nashik Vidhan Parishad Election : विजय मिळताच गोकुळ गितेंची माफी; शिंदे-महाजन यांचं ऐकलं, पण...

Nashik Vidhan Parishad Election : नाशिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे राज्यभरात चर्चांना उधाण आले असताना, निकालानंतर गोकुळ गिते यांनी दिलेली पहिली प्रतिक्रिया देखील तितकीच चर्चेची ठरत आहे. विशेष म्हणजे, विजयाचा आनंद व्यक्त करण्याऐवजी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत माफी मागत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


निकाल जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गोकुळ गिते यांनी मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले, 6 वर्षांचं या मतदारसंघाच्या आमदराकीचं टेन्युअर आहे. आणि अशा कालावधीमध्ये एक फिट उमेदवार जर लोकांना पाहिजे असेल तर तो त्यांना माझ्या रूपात मिळाला आणि अनफिट उमेदवार त्यांनी नाकारला, असं गीते म्हणाले.



‘मी प्रचार थांबवला होता; कार्यकर्त्यांनी मात्र ऐकलं नाही’


गोकुळ गिते (Gokul Gite)  यांनी निवडणुकीदरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्या शब्दाला मान दिल्याचे सांगितले. मात्र कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळेच हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. मी माझा प्रचार थांबवला होता. एकनाथ शिंदे आणि गिरीष महाजन यांच्या शब्दाला मान देऊन घरातच बसलो होतो. पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही, याबद्दल मी त्यांची माफी मागतो. पण माझ्या कार्यकर्त्यांनी हा जो विजय मला मिळवून दिला त्याबद्दल मी शतश: आभारी आहे, असं गोकुळ गीते विजयानंतर म्हणाले.



नरेंद्र दराडेंच्या आरोपांवर बोलणं टाळलं


निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत विश्वासघात झाल्याचा आरोप केला होता. काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली होती. मात्र याबाबत प्रतिक्रिया विचारली असता गोकुळ गिते यांनी अत्यंत संयमित भूमिका घेतली.दराडे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी केवळ, “त्यांचं उत्तर तेच देतील,” एवढेच सांगितले. पुढील कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे संभाव्य वादाला त्यांनी सुरुवातीलाच पूर्णविराम दिल्याचे पाहायला मिळाले.



शिवसेनेत जाणार का? गितेंनी दिलं सावध उत्तर


निकालानंतर गोकुळ गिते यांना शिवसेना (शिंदे गट) कडून संपर्क साधण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, गिते यांचे निकटवर्तीय नाना गामने यांना मंत्री उदय सामंत यांनी दूरध्वनी करून संपर्क साधल्याची माहिती समोर आली होती. यानंतर गिते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही वेग आला.


मात्र याबाबत प्रश्न विचारला असता गोकुळ गिते यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यास नकार दिला. या सर्व चर्चांबाबत मला कोणतीही अधिकृत माहिती नाही. तुम्हाला काही माहिती असेल तर मला माहीत नाही. सध्या मी कोणत्याही निर्णयाच्या टप्प्यावर नाही, असे ते म्हणाले.



‘कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय नाही’


पुढील राजकीय वाटचालीबाबत बोलताना गिते यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. हा विजय केवळ त्यांचा नसून हजारो कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा विजय जरी माझ्या नावावर झाला असला तरी या विजयामागे असंख्य कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही राजकीय निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्या भावना, त्यांचे मत आणि त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल, असे गिते म्हणाले.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.