Nashik Vidhan Parishad Election Result 2026 Gokul Geete : नाशिकमधून गोकुळ गीते यांचा दणदणीत विजय

नाशिक: राज्यभराचे लक्ष लागलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच फेरीत आवश्यक विजयाचा कोटा पूर्ण करत गीते यांनी निवडणूक जवळपास एकतर्फी जिंकली. (Nashik Vidhan Parishad Election Result 2026 Gokul Geete)


मतमोजणीला सकाळी सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच फेरीत गोकुळ गीते यांनी मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले. उपलब्ध माहितीनुसार, त्यांनी विजयासाठी आवश्यक मतसंख्या सहज गाठली असून त्यांना तब्बल ३८९ मते मिळाल्याचा दावा समर्थकांकडून करण्यात येत आहे. निकालाचे चित्र स्पष्ट होताच मतमोजणी केंद्राबाहेर गीते समर्थकांनी जल्लोष सुरू केला. (Nashik Vidhan Parishad Election Result 2026 Gokul Geete)



मतमोजणीपूर्वी तणावाचे वातावरण : 


मतमोजणी सुरू होण्यापूर्वी केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गोकुळ गीते यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या मतमोजणी कक्षातील उपस्थितीवर आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार विद्यमान लोकप्रतिनिधींना प्रतिनिधी म्हणून मतमोजणी कक्षात बसण्यास मनाई असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. (Nashik Vidhan Parishad Election Result 2026 Gokul Geete)


यामुळे दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने आले आणि काही काळ वादावादी झाली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित बाबींची सुनावणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिस बंदोबस्तात मतमोजणीची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यात आली. (Nashik Vidhan Parishad Election Result 2026 Gokul Geete)




छुप्या मतदानाची चर्चा ठरली खरी?


निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून क्रॉस व्होटिंग आणि छुप्या मतदानाबाबत व्यक्त करण्यात आलेल्या शंका निकालानंतर अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ महायुतीच्या बाजूने असतानाही गोकुळ गीते यांना मिळालेला मोठा पाठिंबा अनेक प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, महायुतीच्या मतांमध्ये झालेली फूट आणि स्थानिक पातळीवरील नाराजी यांचा फायदा गोकुळ गीते यांना झाला. ग्रामीण तसेच शहरी भागातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. (Nashik Vidhan Parishad Election Result 2026 Gokul Geete)



दरम्यान, प्रचारादरम्यान "मतदारांचा कल माझ्या बाजूने आहे आणि मीच विजयी होणार," असा विश्वास व्यक्त करणारे गोकुळ गीते यांचा दावा अखेर खरा ठरला असून नाशिकच्या राजकारणात त्यांनी मोठी राजकीय ताकद दाखवून दिली आहे. (Nashik Vidhan Parishad Election Result 2026 Gokul Geete)

Comments
Add Comment

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण