US Iran Conflict : इराण-अमेरिका संघर्ष टळणार? दोन्ही देशांमध्ये चर्चेचा नवा आराखडा

अमेरिका आणि इराण (America Iran) यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमध्ये ( Switzerland ) सुरू असलेल्या चर्चेत महत्त्वाची प्रगती झाल्याची माहिती समोर आली आहे. चर्चेचे मध्यस्थ असलेल्या कतार ( Qatar Mediation) आणि पाकिस्तानने दावा केला आहे की, दोन्ही देशांनी ६० दिवसांच्या आत अंतिम करार करण्यासाठी एका प्राथमिक आराखड्यावर सहमती दर्शवली आहे. (International News)



मिळालेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी अमेरिका आणि इराण यांनी थेट संपर्कासाठी विशेष कम्युनिकेशन लाईन सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तसेच संभाव्य लष्करी संघर्ष टाळण्यासाठी लेबनॉनच्या सहभागासह ‘डी-कॉन्फ्लिक्ट सेल’ स्थापन करण्यावरही दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.


मात्र चर्चेची सुरुवात तणावपूर्ण वातावरणात झाली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) यांनी इराणला कठोर इशारा दिल्यानंतर इराणी शिष्टमंडळाने काही काळ चर्चेतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर मध्यस्थांच्या हस्तक्षेपामुळे चर्चा पुन्हा सुरू करण्यात आली.


इराणचे प्रमुख वाटाघाटीकार मोहम्मद बागेर गालीबाफ (Mohammad Bagher Ghalibaf) यांनी अमेरिकेच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत इराण आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वान्स (JD Vance) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चर्चेला पुढे नेण्यासाठी अनेक बैठका घेतल्या.



दरम्यान, इराणचे अध्यक्ष  मसूद पेझेश्कियान (Masoud Pezeshkian) यांनी युरेनियम संवर्धनाचा अधिकार कायम ठेवण्याची भूमिका पुन्हा मांडली. मात्र इराणला अणुबॉम्ब विकसित करण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाली असून पुढील आठवडाभर दोन्ही देशांची तांत्रिक पथके विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. त्यामुळे अमेरिका-इराण संबंधांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (US Iran Conflict)



Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे