पत्रकाराने विचाराला प्रश्न अन्...
शोच्या लाँच कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद सुरू असताना एका पत्रकाराने रितेशला सलमान खान आणि संजय दत्त यांच्याबाबत प्रश्न विचारला. या दोघांना तुरुंगवासाचा अनुभव असल्याने त्यांना ‘लॉक अप’ शोमध्ये आणाल का आणि त्यांना कोणती शिक्षा द्याल, असा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न रितेशला आवडला नाही. यावर प्रतिक्रिया देताना रितेश म्हणाला की, या प्रश्नाला उत्तर देऊन त्याला महत्त्व द्यायचे नाही. त्यामुळे तो यावर काहीही बोलणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. त्यानंतरही सलमान आणि संजय दत्त यांना शोमध्ये सहभागी करण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर रितेशने सांगितले की, शोमध्ये कोण सहभागी होणार याचा निर्णय तो घेत नाही. त्याची भूमिका केवळ होस्ट म्हणून असून स्पर्धकांची निवड निर्माते आणि शोची टीम करत असते.या कार्यक्रमात दिग्दर्शिका फराह खान आणि नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट प्रमुख मोनिका शेरगिलही उपस्थित होत्या. मोनिकाने हलक्या-फुलक्या अंदाजात रितेश आणि फराह यांचे कौतुक करत दोघेही शोसाठी योग्य ‘जेलर’ असल्याचे सांगितले.#riteishdeshmukh #salmankhan #sanjaydutt “My Duty Is To Host” – Riteish Deshmukh Reacts to Salman Khan & Sanjay Dutt Joining Lock Upp#lockupp2 #riteishdeshmukh #netflix #viraltv pic.twitter.com/hz0OJi0vOx
— VIRAL TV (@imviraltv) June 22, 2026






