CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वर घेतली भाजप आमदारांची बैठक

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भाजप आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. आमदारांचा कामकाजातील सहभाग, विषयांची मांडणी, सोबतच 'एसआयआर'सह (SIR) महत्त्वाच्या पक्ष कार्यक्रमातील कामगिरीवरून आमदारांना या बैठकीत सूचना करण्यात आल्याचे समजते.


सोमवारी अधिवेशनाचा पहिला दिवस नियमित कामकाजात पार पडला. त्यानंतर रात्री भाजप (BJP) आमदारांची वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील उपस्थिती, विविध मुद्दयांवर आमदारांची सभागृहातील कामगिरीची यावेळी चर्चा झाली. दोन्ही सभागृहात भाजप आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, सभागृहात अनेक आमदारांची पूर्णवेळ उपस्थिती दिसत नाही. सकाळच्या सत्रात विधानभवनात दाखल झालेले आमदार पूर्णवेळ सभागृहात नसतात, स्वतःच्या विषयापुरते हजेरी आणि अन्य वेळात आमदार इतरत्र गाठीभेटी करत असल्याचे चित्र मागील अधिवेशनात दिसून आले आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत आमदारांना सभागृहातील उपस्थिती वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, विविध संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करत पक्ष आणि सरकारची बाजू जोरकसपणे मांडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीसह अनेक विषयात राज्य सरकारकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. विविध क्षेत्रांत महत्वाचे निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी सुरू आहे. या सर्वांचे प्रतिबिंब आमदारांच्या मांडणीतून उमटायला हवे. त्यासाठी कल्पकतेने मांडणी करण्याच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत.


विधिमंडळातील कामकाजातील सहभाग आणि त्याचा दर्जा वाढविण्यासोबतच पक्ष कार्यक्रमाबाबतही आमदारांकडून सजग कामगिरीची अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. विशेषतः राज्यात एसआयआर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेकडे आमदारांनी गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. आपापल्या मतदारसंघात ही प्रक्रीया परिणामकारकपणे पार पडेल, याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रात्री उशीरापर्यंत ही बैठक चालली.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण