Nashik Crime : दुहेरी हत्याकांडाने मनमाड शहरात खळबळ, साखरझोपेत असतानाच दगडाने ठेचलं अन...

Nashik Crime : मनमाड शहरात रविवारी (दि. २१) मध्यरात्री घडलेल्या दोन घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे. एका मजुराच्या हत्येच्या आरोपीचा शोध सुरु असतानाच दुसऱ्या मजुराची हत्या करण्यात आली आहे. भरवस्तीत झोपलेल्या दोन मोलमजुरांची अशा प्रकारे हत्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्मांण झाले आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी मनोज नंदू बोमराज याला ताब्यात घेतलंय. मात्र हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



नेमकं काय घडलं ?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अडीच वाजता गस्त घालण्याच्या सुमारास पोलीस पथकाला तीन नागरिकांनी फोन केला आणि पुणे-इंदूर महामार्गालगत (Pune-Indore Highway) एच.पी. पेट्रोल पंपासमोरील अलंकार टॉकीजजवळ एक वेडसर व्यक्ती झोपलेल्या इसमावर मोठे दगड टाकून हल्ला करत आहे. अशी माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.


घटनास्थळी पोलिसांना ३५ ते ४० वर्षे वयोगटातील एका अनोळखी व्यक्तीच्या डोक्यावर मोठ्या दगडाने हल्ला झाल्याचे आढळले. जखमीला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला मालेगाव येथे हलविण्यात आले; मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.



हल्लेखोराचा शोध सुरू असताना दुसरी घटना


दरम्यान, हल्लेखोराचा शोध सुरू असताना शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर महामार्गालगत (Pune-Indore Highway)  भारत पेट्रोल पंपाजवळ, एसटी बसस्थानकाच्या कंपाउंडलगत आणखी एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. चौकशीअंती त्याची ओळख बाळू प्रल्हाद अमृतसागर (वय ३५, रा. खेड, जि. धुळे) अशी पटली. त्याच्याही डोक्यावर मोठ्या दगडाने वार करण्यात आले होते.


घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, रेल्वे ओव्हरब्रिजखालून रेल्वे स्थानकाच्या दिशेने घाईघाईने जात असलेली एक व्यक्ती संशयास्पद आढळली. तिला पकडण्याचा प्रयत्न करताच त्या व्यक्तीने पोलिसांवर दगड फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव मनोज नंदू बोमराज (रा. बागमार, ता. पांडाणा, जि. खंडवा, मध्य प्रदेश) असल्याचे सांगितले.



दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ


घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, ठसे तज्ज्ञ आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला. दोन्ही मृतदेहांचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. एका मृताची ओळख पटली असली तरी दुसऱ्या मृताची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही. शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दोन्ही मृत व्यक्ती मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. रात्री मिळेल त्या ठिकाणी झोपण्याची त्यांची सवय होती. झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर मोठे दगड टाकून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.


या धक्कादायक दुहेरी हत्याकांडामुळे मनमाड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मनोज नंदू बोमराज याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी राजेंद्र खैरनार यांनी फिर्याद दिली आहे. घटनेचा अधिक तपास सुरु आहे .

Comments
Add Comment

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय