Nashik : मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून लासलगाव-पाटोदा-नगरसुल काँक्रिटीकरणासाठी ३४० कोटी निधी मंजूर

Nashik : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पातून लासलगाव-पाटोदा-नगरसुल राज्य महामार्गच्या (Lasalgaon-Patoda-Nagarsul State Highway) काँक्रिटीकरणासाठी तब्बल ३४० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली असून या रस्त्याची रुंदी १० मीटर असणार आहे.या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे येवला मतदारसंघातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम होणार असून शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ केंद्र म्हणून ओळखली जाते. लासलगाव-पाटोदा-नगरसुल (Lasalgaon-Patoda-Nagarsul State Highway) हा मार्ग कृषी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात कांदा, भाजीपाला, धान्य तसेच इतर कृषी मालाची वाहतूक केली जाते. या रस्त्यावरील दळणवळण लक्षात घेऊन या मार्गाचे काँक्रिटीकरण व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.



आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार


या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon Agricultural Produce Market Committee) जलद आणि सुरक्षितपणे पोहोचविता येणार आहे. वाहतूक खर्चात बचत होणार असून मालाच्या वाहतुकीस लागणारा वेळही कमी होणार आहे. तसेच या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील उद्योग, व्यापार आणि आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार आहे.


यापूर्वीही मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal)  यांच्या विशेष प्रयत्नांतून पिंपळस ते येवला या महत्त्वाच्या चौपदरी काँक्रीटीकरण मार्गासाठी ५६० कोटी रुपये तसेच लासलगाव-विंचूर चौपदरी काँक्रीटीकरण रस्त्यासाठी १३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या रस्त्यांची कामे वेगाने सुरु आहे. आता लासलगाव -पाटोदा-नगरसुल मार्गालाही काँक्रीटीकरण करण्यासाठी ३४० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने येवला-लासलगाव परिसरातील रस्ते विकासाच्या कामांना आणखी बळ मिळाले आहे.


या सर्व प्रकल्पांमुळे येवला मतदारसंघ आणि परिसरातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला जाणार असून दळणवळण व्यवस्था अधिक आधुनिक आणि सक्षम होणार आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ही विकासकामे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.



कृषी उत्पादनांच्या वाहतुकीला चालना मिळेल


मंत्री छगन भुजबळ यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे आणखी एक महत्त्वाचा रस्ता मंजूर झाला आहे. लासलगाव पाटोदा-नगरसुल मार्ग हा केवळ वाहतुकीचा रस्ता नसून तो हजारो शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी जोडलेला जीवनमार्ग आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीला मोठी चालना मिळेल, बाजारपेठांशी संपर्क वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल. पिपळस येवला, लासलगाव-विंचूर आणि आता लासलगाव-पाटोदा-नगरसुल अशा सलग मंजुरी मिळालेल्या रस्ते प्रकल्पांमुळे संपूर्ण परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. विकासकामांच्या माध्यमातून जनतेला दिलेला शब्द मंत्री छगन भुजबळ सातत्याने पूर्ण करत आहेत.


- समीर भुजबळ, माजी खासदार

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला