Gold Rate Today : सुवर्णसंधी ! सोन्याने दोन आठवड्यांतील नीचांकी पातळी गाठली ; सोन्याचे आजचे दर काय ?

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी सुवर्ण बाजारपेठ उघडताच सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान आज बुधवारी देखील सोन्याचे भाव कोसळल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून आला असून, सोन्याने जवळपास दोन आठवड्यांतील नीचांकी पातळी गाठल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा एकदा मौल्यवान धातूंच्या बाजाराकडे वळले आहे.



सोन्याचे आजचे दर


आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी बाजारात तेजीचे व तावरण निर्माण झाल्याने सोन्याच्या दरात १ हजार ७५१ रुपयांची वाढ झाली आणि सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ५१ हजार ९२५ रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र, ही तेजी केवळ एक दिवसच टिकली. मंगळवारी सकाळी बाजारपेठ सुरू होताच सोन्याच्या दरात पुन्हा १ हजार ७५१ रुपयांची घसरण झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर पुन्हा जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ५० हजार १७४ रुपयांवर आले. तर आज बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा घट नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४७,८०५ रुपयांपर्यंत खाली आले. दोन दिवसांतच सोन्याच्या दरात तब्बल ४१२० रुपयांची घसरण झाल्याची नोंद घेतली गेली.



चांदीचे आजचे दर


जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी ५१५० रुपयांची वाढ झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,४९,२६० रुपयांपर्यंत पोहचली होती. तर मंगळवारी तब्बल ११,३३० रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३७,९३० रुपयांपर्यंत घसरली. बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ४१२० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३३,८१० रुपयांपर्यंत खाली आली. दोन दिवसांतच चांदीच्या दरात तब्बल १५,४५० रुपयांनी घसरण झाल्याची नोंद घेतली गेली.



खरेदीदारांसाठी समाधानाचे वातावरण


दरम्यान, सराफा बाजारात बुधवारी सकाळी मोठी घसरण नोंदवली गेल्याने सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले. सोने आणि चांदीच्या किमतींमधील या घसरणीमुळे दागिने खरेदीदार, गुंतवणूकदार आणि सराफा व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या वाढत्या मजबुतीचा आणि अमेरिकेच्या केंद्रीय बँकेकडून म्हणजेच फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीच्या संभाव्य संकेतांचा मोठा परिणाम सोन्याच्या किमतींवर झाला आहे.


दरम्यान, किमतींमधील घसरणीमुळे जळगावसह विविध शहरांतील सराफा बाजारात ग्राहकांची चौकशी वाढल्याचे दिसून आले आहे. आगामी लग्नसराई, सणासुदीचा काळ आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेक ग्राहक या घसरणीकडे संधी म्हणून पाहत आहेत. मात्र तज्ज्ञांनी सावध भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे. केवळ किमती घसरल्या म्हणून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यापेक्षा जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरची स्थिती आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पुढील निर्णयांवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे ते सांगतात.

Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल