Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी


कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. ताराताला (Taratala) परिसरातील बांधकाम सुरू असलेली एक इमारत अचानक कोसळल्याने अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, किमान दोन जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.


ही घटना दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास ब्रेस ब्रिज रेल्वे स्थानकाजवळील ऑक्टेव्हियस टी अँड इंडस्ट्रीजच्या गोदाम परिसरात घडली. स्थानिकांच्या माहितीनुसार, इमारत कोसळली तेव्हा आत २५ ते ३० कामगार उपस्थित होते.



मिळालेल्या माहितीनुसार, तीन मजली लोखंडी आणि सिमेंटच्या शेडचे बांधकाम आणि नूतनीकरणाचे काम सुरू होते. अचानक इमारतीचा वरचा भाग कोसळल्याने संपूर्ण रचना ढासळली आणि अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले.


घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा हटवण्यासाठी बुलडोझर, जेसीबी आणि स्टील कटिंग मशीनच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.



जखमी कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतरांचा शोध सुरू आहे. इमारत कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.


या दुर्घटनेनंतर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि