IND vs PAK: भारताचा पाकिस्तानवर थरारक विजय; ४-३ ने सामना जिंकत केली FIH प्रो लीगची सुरुवात

London : लंडनमध्ये खेळल्या गेलेल्या FIH प्रो लीग 2026 मधील बहुचर्चित भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय हॉकी संघाने 4-3 असा रोमांचक विजय मिळवत कट्टर प्रतिस्पर्ध्यावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. एकवेळ भारताने 4-1 अशी भक्कम आघाडी घेतली होती, मात्र अखेरच्या मिनिटांत पाकिस्तानने जोरदार पुनरागमन करत सामना चुरशीचा बनवला.







सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानने गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले,पण पाकिस्तानच्या बचावफळीने सर्व प्रयत्न निष्फळ ठरवले. त्यामुळे पहिल्या सत्राअखेर पाकिस्तानकडे एक गोलची आघाडी कायम होती.दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये मात्र भारताने दमदार पुनरागमन केले. अभिषेकने शानदार गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर निलाकांत शर्माने अचूक फिनिशिंग करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत भारतीय संघाने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते.तिसऱ्या क्वॉर्टरध्ये भारताचा आक्रमक खेळ कायम राहिला. सुखजीत सिंहने सुंदर गोल करत भारताची आघाडी 3-1 अशी वाढवली. पाकिस्तानच्या बचावफळीवर सतत दबाव निर्माण करत भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना गोल करण्याची संधीच दिली नाही.







अंतिम क्वॉर्टरमध्ये भारताने आणखी एक गोल करत स्कोर 4-1 असा केला. त्यानंतर सामना भारताच्या खिशात गेला असे वाटत असतानाच पाकिस्तानने शेवटच्या काही मिनिटांत जोरदार प्रतिहल्ला चढवला. सलग दोन गोल करत त्यांनी 4-3 असा स्कोर करत भारतीय चाहत्यांची धडधड वाढवली. मात्र निर्णायक क्षणी भारतीय बचावफळीने शानदार खेळ दाखवला. पाकिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडत भारताने अखेर 4-3 असा विजय निश्चित केला. या विजयामुळे भारताने महत्त्वाचे तीन गुण मिळवले आणि प्रो लीगमधील आपली मोहीम अधिक मजबूत केली

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त