Kalyan Crime : कल्याणामध्ये विकृतीचा कळस; ७ वर्षांच्या मुलीला टोमॅटो देण्याच्या बहाण्याने घरात ओढून अत्याचार

Kalyan: कल्याणमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या  ७ वर्षांच्या चिमुरडीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतपाची लाट पसरली आहे.


नेमकं घडलं काय ?  

कल्याणच्या (Kalyan) पूर्वमधील कोळशेवाढी पारिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित चिमुरडी आणि आरोपी दोघेही मूळचे उत्तर प्रदेशमधील एकाच गावचे रहिवासी आहेत. आरोपी जुमयी आली शेख गेल्या दोन वर्षापासून या परिसरात राहत होता.  सदर व्यक्ती ५५ वर्षाचा असून बुधवार २४  जून २०२६ रोजी या नराधमाने दोन वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले.


मुलीला टोमॅटो देण्याच्या बहाण्याने त्याने तिला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अनुराग सिंह हेदेखील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीला मारहाण केली आणि कोळशेवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी गुन्हेगाराला धडा शिकवावा, जेणेकरून पुन्हा कोणी असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही, अशी मागणी होत आहे. दिवसाढवळ्या अशा घटना घडत असल्याने रहिवाशांमध्ये, विशेषतः पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जनता आता पोलिसांच्या गस्तीबाबत उत्तरदायित्वाची मागणी करत आहे आणि कायदा अंमलबजावणीच्या उपस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आहे.









Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण