Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश; धान्य वितरणाची मुदत ३० जूनपर्यंत वाढवली

लाखो शिधापत्रिकाधारकांना दिलासा; उद्यापासून स्वस्त धान्य दुकानांमधून पुन्हा वितरण सुरू



मुंबई, दि. २४ जून : राज्यातील (Maharashtra) लाखो शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने (Central Government) घेतला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ  (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरणाची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप धान्य न मिळालेल्या लाखो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


यापूर्वी धान्य वितरणाची अंतिम मुदत १५ जून निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्या कालावधीत राज्यातील सुमारे ७५ टक्के लाभार्थ्यांपर्यंतच धान्य पोहोचले होते, तर जवळपास २५ टक्के लाभार्थी विविध कारणांमुळे धान्यापासून वंचित राहिले होते.



कोणताही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्राने धान्य वितरणासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ मंजूर केली आहे.


या निर्णयामुळे राज्यातील लाखो लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उद्यापासून स्वस्त धान्य दुकानांमधून पुन्हा वितरण प्रक्रिया सुरू होणार आहे.


मंत्री भुजबळ यांनी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून महाराष्ट्रातील परिस्थितीची माहिती दिली होती. तसेच उर्वरित लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळावा यासाठी वितरणाची मुदत वाढविण्याची विनंती केली होती.


मंत्री भुजबळ यांच्या या मागणीची दखल घेत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी धान्य वितरणाची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दिलासा मिळणार असून उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



मुदतवाढीच्या निर्णयानंतर उद्यापासून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन नियमानुसार धान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.


महाराष्ट्रातील एकही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यापुढेही लाभार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी